भाजपचे किरण ठाकरे यांचे शेतकऱ्यांच्या न्यया साठी आंदोलन

कर्जत, गणेश पुरवंत

कर्जत तालुक्यातील गुरुचरण जमिनी, देवस्थानाच्या जमिनी यात मोठा काळाबाजार आहे. तर उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमिनीचे दावे चालतात. मात्र यात गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय देण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी तक्रारी केल्या मात्र त्यावर निर्णय न झाल्याने आता थेट धरणे आंदोलन करत ठाकरे हे कर्जत शहराच्या लोकमान्य टिळक चौकात आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढणार असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले आहे.

कर्जत तालुक्यामधील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमीन महसूल व भाडेपट्टा अधिनियमानुसार महसूल व भाडेपट्टाची अपिले चालतात सदर अपिले अधिनियमातील तरतुदीनुसार चालत नसून राजकीय व आर्थिक हेवेदावे असल्याने चालत आहेत. या माध्यमातून वर्षानुवर्ष जमीन कसत असणाऱ्या खेडोपाड्यातील गोरगरीब शेतकरी वर्गावर अधिनियमातील तरतुदीचा मनमानी पद्धतीने वापर करून उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या माध्यमातून अन्याय होत आहे. सदर बाबत ठोस निकाल जनतेच्या हितासाठी येणे गरजेचे असून अर्धन्यायिक अधिकार असणाऱ्या बेजबाबदार अधिकारी यास लगाम लागणे आवश्यक आहे. सदर बाबत शासनाकडे महसुली प्रकरणाचे निकाल तपासणे व अन्य मागण्यासाठी पत्रव्यवहार केला असून राजकीय दबाव व वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने कारवाई होत नसल्यानेअखेरीस आज दिनांक २० जानेवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अशी माहिती भाजपचे किरण ठाकरे यांनी दिली. यासह उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे ह्यांची आतापर्यंतच्या जमीन प्रकरणातील निकाली काढलेल्या प्रकरणाची मेरिट नुसार चौकशी व्हावी. सबंधित अधिकारी यांची लाचलुचपत खात्याच्या माध्यमातून फौजदारी चौकशी व्हावी. कर्जत तालुक्यातील जमीन हस्तांतरण प्रकरणांची चौकशी होत आहे तो पर्यंत शिस्त व अपील अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page