कर्जत, गणेश पुरवंत
मागील निवडणूकीत आपल्या नवोदित संपर्क प्रमुख पदाचा करिश्मा दाखवत माथेरान नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून सतरा पैकी चौदा जागा निवडून आणल्या होत्या.त्यामध्ये प्रसाद सावंत हे स्वतः नगरसेवक म्हणून आणि त्यांच्या पत्नी प्रेरणा सावंत या नगराध्यक्ष म्हणून निवडून गेले होते.तदनंतर शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर यांची वर्णी शहरप्रमुख पदी करण्यात आली.पण सर्व पदे माझ्या घराण्यात नको म्हणून त्यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.मात्र राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच कुलदीप जाधव यांची शहरप्रमुख पदाची नेमणूक करावी अशी शिफारस केल्याचे समजते.
त्यामुळे माथेरान शिवसेना शहरप्रमुख पदी क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष,माजी नगरसेवक कुलदीप जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे.प्रसाद सावंत यांना याबाबत विचारले असता.त्यांनी सांगितले की मी जरी शिवसेना शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी मी शिवसेनेचा एक निष्ठावन्त कार्यकर्ता म्हणून उध्दव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काम करत राहणार.ईतर कोणत्याही पक्षात जाण्याचा मी विचार करूच शकत नाही.
कुलदीप जाधव यांनी क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष पदाची धुरा अत्यंत प्रभावीपणे सांभाळली होती.त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने त्यांची नियुक्ती झाल्यामुळे फक्त मराठा समाजचं नव्हे तर इतर समाज बांधवांनी सुद्धा सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.याबाबत कुलदीप जाधव म्हणाले की ही जबाबदारी खूप मोठी असून सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी दिवसरात्र एक करणार आणि शिवसेना वाढीसाठी योगदान देणार.