कळंब येथे हजरत शेख अली शाह बाबा यांचा उर्स संदल मिरवणूक मोठया उत्साहात, उर्साला शेकडो वर्षांची परंपरा

कर्जत, गणेश पुरवंत

  कळंब येथे मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख अली शाह बाबा यांचा दर्गा आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात बाबांचा उर्स साजरा केला जातो. यंदा देखील दिनांक २२ जानेवारीपासून या उर्साला सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात सर्वधर्मीय नागरिक सहभागी होतात. तर दुसऱ्या दिवशी कव्वालीचा जय्यत कार्यक्रम असतो. हि कव्वाली ऐकायला पंचक्रोशीतून नागरिक येत असतात. 
   कर्जत तालुक्यात जिल्ह्याची शेवटच्या हद्दीवर कळंब गाव वसलेले आहे. अत्यंत छोटेखानी असलेले हे असून याठिकाणी मुस्लिम-हिंदू धर्मीय अशी मिश्र लोकवस्ती असून सगळे गुण्यागोविंदाने अनेक वर्षे येथे नांदत आहेत. गावात हजरत शेख अली शाह बाबा यांचा दर्गाह असून याठिकाणी वर्षातून एकदा जानेवारी महिन्यात उर्स भरत असतो. यावर्षी दिनांक २२ जानेवारीपासून या ऊर्सला सुरवात झाली आहे. यंदा हा कार्यक्रम ३ दिवस सूर राहणार असल्याचे उर्स कमिटी कळंब यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी रात्री बाबांची संदल काढण्यात आली. ती संदल संपूर्ण गावातून फिरवून पुन्हा दर्ग्याच्या ठिकाणी आणतात.  हजरत  बाबा उर्स कमिटी कळंबचे अध्यक्ष फाईक खान, उपाध्यक्ष नदीम मस्ते, खजिनदार शानवाज पानसरे, अकिब पानसरे, जुल्फी शाह, मुन्ना खोत, शाहीद मस्ते, रमिज कोईलकर, अफजल डोंगरे, फुरकान कुरेशी, राईस बुबरे, फैज लोगडे, लाला भातभार्डे फण्णू लोगडे यांच्या माध्यमातून अतिशय नेटके नियोजन करण्यात आलेले आहे. 
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page