कर्जत तालुक्यात प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

कर्जत, गणेश पुरवंत

अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी आयोजित प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संबंध देशात उत्सव साजरा केला जात होता. कर्जत तालुक्यात दिवसभराच्या कार्यक्रमांनंतर रामलल्ला यांची पालखी व महाआरतीने प्राणप्रतिष्ठा उत्सवाची सांगता करण्यात आली. यानिमीत्ताने तालुक्यातील गावागावात पालखी व महाआरतीला अथांग जनसमुदाय लोटला असल्याचे नयनरम्य चित्र निर्माण झाले होते. रामजन्मभूमी अयोध्या नगरीत अनेक वर्षानंतरमंदिरांचे निर्माण होऊन त्यात प्रभु श्रीराम यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या उत्सवाला समस्त हिंदूं धर्मियांच्या भावनांची किनार असल्याने संबंध देशात हा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर सगळीकडे भरगच्च कार्यक्रमाँचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी नेरळ शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व व्यापारी संघटना नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने रामल्ला यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संबंध नेरळ शहरातून हि पालखी मिरवणूक काढत अखेरीस जुन्या बाजारपेठेतील राम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे १५०० च्यवर नेरळकर या पालखी यात्रेत सहभागी झाले होते. तर तरुणांचा उत्साह गगनाला भिडला होता. यावेळी जय श्रीराम च्या घोषणांनी नेरळ शहर दुमदुमून गेले होते.

नेरळ जवळील उल्हास नदीकिनारी दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सरपंच मेघा मिसाळ, उपसरपंच नरेश कालेकर, सदस्य यशवंत भंवारे, आदेश धुळे, महेंद्र मोगरे, लक्ष्मण वाघमारे, सुमित्रा भोईर, सोनम गायकवाड, स्वाती विरले, रोहनी विरले, मानसी तरे, वनिता जामघरे, रूपेश मिसाळ यांच्या माध्यमातून आयोजित महाआरतीला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. तर यावेळी परिसरातील लहान मुलांनी राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा करत नदीतीरावर दाखल होताच उपस्थितांनी जय श्रीरामाचा एकच जयघोष केला.

कर्जत येथे कारसेवकांचा सन्मान

कर्जत शहरात उल्हासनदीकिनारी एक दिवा श्रीरामासाठी हा उपक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्यामाध्यमातून करण्यात आला तर यावेळी विकास चित्ते , राजाभाऊ कोठारी , दिपक बेहरे, राजेश कुलकर्णी , मंगेश राऊत .अभय गुरव, नंदकुमार मनेर, राजू वर्धावे, सुनिल जाधव, संजय वरघडे, राजेंद्र जगताप, संजय वझरेकर, विजय कडू, देवेंद्र खोत,अमित गुरव,विनोद परिट,सुरेश देवघरे,जिवन लोवंशी (कर्जत)संदिप सुर्वे (पळसदरी) भालचंद्र गायकवाड, शैलैश सातपुते(कर्जत) , संजय वरघडे, विनायक चितळे सर(कर्जत) गांगल, ज्ञानेश्वर शिवेकर ( लाखरण) आदी कारसेवकांचा सन्मान आमदार महेंद्र थोरवे यांच्याहस्ते करण्यात आला

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page