पेण, विशेष प्रतिनिधी
प्रजासत्तक दिनाचे अवचित्य साधून पेणमधील 'मामा वासकर'जलतरण तलाव येथे'अखिल भारतीय मराठा महासंघ' यांच्या वतीने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सचिन शिंगरूत आणि किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेवर उरणच्या स्पर्धाकांनी छाप सोडल्याचे पहायला मिळाले आहे.
अपुऱ्या सुविधा, सरावासाठी कमी वेळ आणि ऑलम्पिक स्टाईल तरण तलावाची कमतरता असतानाही रायगड जिल्ह्यातून राष्ट्रीय, आंतरराराष्ट्रीय जलतरणपटू तयार होत आहेत. यासाठी जिल्ह्याभरातील प्रशिक्षक आणि जलतरणपटू कठीण परिश्रम घेत आहेत. यातूनच घेण्यात येणाऱ्या स्पर्धामधून या स्पर्धाकांची चाचपणी केली जात आहे. अशाचप्रकारे देशाच्या प्रजासात्ताक दिनी पेण, रायगड येथील नगरपरिषदेच्या 'मामा वास्कर' या जलतरण तलाव येथे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. फ्रिस्टाईल, बँकस्ट्रोक, बटरफ्लाय आणि ब्रेस्टस्ट्रोक या चारही प्रकारातील ५० मिटर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये ६ वर्षे वयोगटापासुन खुलागट आणि जेष्ठ नागरिक गटांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये उरणच्या स्पर्धकांनी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ अशा सर्वाधिक ३३ पदकांची कमाई करत स्पर्धेवर आपली छाप सोडली आहे. यामध्ये अंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन मोडखरकर याच्याकडे सर्वांचेच लक्ष होते. आर्यनने तीन गोल्ड आणि एका ब्रॉन्झ पदकांची कमाई या स्पर्धेमध्ये केली आहे. तर स्पर्धेच्या आयोजनाने जिल्ह्यातील जलतरण पटुंना स्वतःची क्षमता तपासण्याची संधी मिळाली आहे.