उरण, प्रतिनिधी
आधुनिक जीवनामध्ये मांवाचे जीवन घड्याळाच्या काट्यपेक्षा पुढे धावत आहे. यामुळे आहारपद्धती देखील बदलत आहे. ज्यामुळे विविधता आजराना सामोरे जावे लागत आहे. यासाठी उरणमधील मोठी जुई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बदलते जीवन, त्यामुळे उद्भवणारे आजारी आणि आपातकालीन परिस्थितीमध्ये करायच्या गोष्टी याबाबत मार्गदर्शन शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
उरण तालुक्यातील मोठी जुई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य आणि आपातकालीन परिस्थिती, याबाबत उरणमधील नामांकित डाक्टर, डॉ. सुरेश पाटील, डॉ. सत्या ठाकरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. अजय कोळी आणि सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विरेश मोडखरकर यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक कौशिक ठाकूर यांच्या माध्यमातून या मार्गदर्शन शाळेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे बदलते जीवन, यामधून बदललेली आहार पद्धती, त्यातून उद्भवणारे आजार आणि आपातकालीन परिस्थितीमध्ये काय करायला हवे याबाबत बाल अवस्थेपासुन मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी या हेतूने ही शाळा घेण्यात आली होती. पहिली ते सातवीच्या वर्गामधील मुलांना हे मार्गदर्शन करण्यात आले. तर यावेळी लहान मुलांमध्ये बळावणाऱ्या ताप, खोकला, गालफी यावर मार्गदर्शन करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांनी मोबाईलच्या जास्त वापरामुळे होणारे नुकसान याबाबत देखील माहिती दिली. तर मोठे होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेऊन मोठे होता येते असे नसून, मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देखील मोठ्या पदावर पोहोचता येते, फक्त मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे असते, हे मुलांना या शाळेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे. यावेळी आपातकालीन परिस्थिती काय? आपातकालीन परिस्थितीमध्ये काय करायला हवे यावर देखील मुलांना माहिती देण्यात आली. या विशेष शाळेच्या नियोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.