उरणच्या रस्त्यावर नागरिकांच्या जीवाशी खेळ, कोण आहते पाठीराखे ?

उरण, विरेश मोडखरकर

 उरणच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून, बेधडकपणे गॅस पेटवून त्यावर कढवलेल्या तेलामध्ये पदार्थ तळले जातं आहेत. रविवारी संध्याकाळी अशाचप्रकारे रस्त्यावरील एका बेकायदेशीर खाद्यापादार्थ तळणाऱ्या गाडीवरील गॅस सिलेंडरच्या नळीला आग लागण्याची घटना घडली. वेळीच सतर्क नागरिकांनी आग विझवली, अन्यथा मोठा अपघात झाला असता. अशाप्रकारे रस्त्यांवरील अतिक्रमित व्यवसायांच्या मागचे सूत्रधार कोण? हातगाडीवाल्यांकडून हफ्ते खातेय कोण? रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई का नाही? असे सवाल या निमित्ताने निर्माण होत आहेत. 
  उरण तालुका आणि त्यालागत असणारे उद्योगधंदे पाहता येथे बाहेरून येणारे नागरिकांचे लोंढे मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यामुळे तालुक्यावरील नागरी सोई सुविधाचा ताण वाढत आहेत. अशातच येणाऱ्या परप्रांतीयांकडून येथील रस्त्यांवर अतिक्रमण करून बेधडक व्यवसाय थाटले जात आहेत. ज्यामुळे रस्त्यावरील रहदारी, पार्किंग, वाहतूक कोंडी यासारख्या समस्या देखील वाढत आहेत. यातच भर रस्त्यामध्ये अशा व्यवसाईकांकडून उघड्यावरच कढईमध्ये तेल तापवून खाद्यापदार्थ तळले जात आहेत. गजबजलेल्या रस्त्यांवर उकळत्या तेलामध्ये पदार्थ तळत असताना छोटेमोठे अपघात नेहमीचेच झाले आहे. रविवारी संध्याकाळी उरणच्या चारफाटा येथे गर्दीच्या ठिकाणी अशाच एका खाद्यपदार्थ तळणाऱ्या हातगाडीवरील गॅसच्या नळीला आग लागली होती. यावेळी सतर्क नागरिकांनी वेळीच आग विझावल्यामुळे पुढील अनर्थ टळला असला, तरी काही काळ याठीकाणी आफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वारंवार अश्या गोष्टी होत असताना देखील रस्त्यावर उघड्यावर तेल तापवून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर अथवा रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल निर्माण होत आहे. तर रात्रीच्यावेळेस अशा बेकायदेशीर व्यावसायकांना लाईट कोण देत? हा सवाल देखील या अनुषंगाने उपस्थित रहात आहे. एखाद्या शेजारील घरामध्ये लाईट गेली असता शेजारधर्म म्हणून लाईट दिली असता वीज वितरण मंडळाकडून कारवाई करण्यात येते. मात्र भर बाजारामध्ये रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या बेकायदेशीर व्यवसाइकांना उघड उघड लाईट दिली जाते मग कारवाई का होत नाही? तर अशा व्यवसायकांना पाठीशी कोण घालत आहे? त्यांच्याकडून कोण हफ्ते गोळा करत आहेत? यांच्या खोलापर्यंत जाणे आता गरजेचे झाले आहे. या सर्वामागे कोण अधिकारी, नेते, कर्मचारी, गावगुंड आहेत हे पाहण्याची वेळ आज आली आहे.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page