नदीतून वाळू चोराचा बंदोबस्त करण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण

कर्जत, गणेश पुरवंत

कितीही काही केलं तरी वाळू माफिया हे वाळू चोरीपासून परावृत्त होत नाहीत. त्यामुळे शासनाने वाळू डेपोची घोषणा केली होती. मात्र ग्रामीण भागातील नद्या आजही वाळू चोरांच्या भक्ष्यासाठी पडत आहेत. अशीच घटना वैजनाथ पोटल परिसरात पेज नदीपात्रात घडत असल्याने येथील नागरिक जयवंत मसने यांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या मात्र एका बाजूला वाळू चोरी होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासन सुस्त असल्याने मसणे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

कर्जत तालुक्यातील पोटल वैजनाथ भागातून वाहणाऱ्या पेज नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची तक्रार पोटल पाली येथील रहिवासी जयवंत धर्मा मसणे यांनी महसूल विभागाकडे सातत्याने मागील वर्षांपासून केली होती. तर याच तक्रारीवरून ऑगस्ट २०२३ मध्ये ६० ब्रास वाळू तर जानेवारी २०२४ मध्ये महिन्यात महसूल विभागाने एक अनधिकृतपणे वाळू भरलेला टॅक्टर पकडला होता. मात्र तरीही वाळू उपसा सुरूच असल्याने मसने यांनी वेळोवेळी तक्रारी करून देखील महसूल विभाग वाळू चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरला. तर दुसरीकडे मसणे यांनी तक्रारी केल्याने त्यांना धमक्या येणे सुरु झाले तर त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे तक्रारदार जयवंत मसणे यांनी थेट उपोषणाचे हत्यार उपसून दिनांक ५ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालय कर्जत येथे आमरण उपोषण सुरु केले. वाळू चोरट्यांचा बंदोबस्त महसूल प्रशासनाने करावा अशी मागणी घेऊन त्यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते जयवंत मसने यांनी घेतली आहे. तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या मसणे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर करत आहेत. तर ४ थ्या दिवशी देखील उपोषण सुरु असल्याने महसूल प्रशासनाला जाग येणार कि उपोषणकर्त्यांचा अंत पाहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page