अलिबाग, अमूलकुमार जैन
मोबाईल रिक्षासाठी 289 प्रस्ताव दाखल
रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वालंबी होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 71 लाभार्थ्यांना मोबाईल ई रिक्षा मिळणार असून या साठी रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून 289 प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावमधून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखालील अलिबाग येथील मुक बधीर शाळेतील विद्यार्थी आदर्श पुरी यांच्या हस्ते सोडत कुंटेबाग येथे काढण्यात सोडत प्रकिया पूर्ण करण्यात आली..
यावेळी सोडत वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य जीत बडे, मुख्य वित्त लेखा अधिकारी कदम, समाज कल्याण अधिकारी डॉ शामराव कदम तर निरीक्षक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने ,दिव्यांग कक्षाचे सल्लागार किशोर वेखंडे, प्रशांत काळे साईनाथ पवार आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात 17 हजारहून अधिक दिव्यांग आहेत. दिव्यांगाच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न सातत्याने करीत आहे. जिल्ह्यातील दिव्यांगाना आर्थिक, बौध्दीक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक नाविन्य पूर्ण योजना हाती घेतली आहे. दिव्यांगांना रोजगार करता यावा यासाठी ई टेम्पो दिले जाणार आहे. 25 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली होती.सदर गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात आले होते.40 टक्के पेक्षा दिव्यांग प्रमाणपत्र,वाहन चालविण्याचा परवाना, उत्पन्नाचा दाखला असे अनेक कागदपत्रे अर्ज देणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड तालुका निहाय प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार सोडत पध्दतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 71लाभार्थ्यांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.
दिव्यांग बांधवाना अधिक हालचाल करता येत नाही, जे स्वतःचा रोजगार प्राप्त करण्यास अक्षम आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हरित उर्जेवर चालणारी पर्यावरणस्नेही फिरती वाहने (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत प्रदान केली जाणार आहेत. त्या वाहनांवर त्यांना विविध व्यवसाय करून स्वतःची उपजिविका भागविता येणार आहे .
डॉ. भरत बास्टेवाड.मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.