अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालक्यातील कुर्डूस येथे तटकरे यांचा बॅनर कोणी लावला असे सांगत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तुषार अनंत शेरमकर, आर्यन तुषार शेरमकर,सुजल दिपक पाटील,आनंत शेरमकर,तन्मयी शेरमकर,रुतिक विनोद शेरमकर,वर्षा शेरमकर(सर्व रा. कुर्डूस, ता. अलिबाग, जि.रायगड) यांनी मारहाण केल्याप्रकरणी चंद्रकांत नामदेव पिंगळे यांनी पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अलिबाग तालुक्यातील पेझारी नागोठणे रस्त्यावरील कुर्डूस येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या शिधा वाटप दुकानासमोर फिर्यादी चंद्रकांत नामदेव पिंगळे हे तिथे थांबले होते.त्यावेळी तुषार अनंत शेरमकर यांचे शिधा वाटप दुकान असून सदर दुकानात आर्यन तुषार शेरमकर हे असताना तुषार अनंत शेरमकर यांने तटकरे यांचा बॅनर कोणी लावला असे बोलुन अप्पा पिंगळे या भडव्याने लावला असे चंद्रकांत नामदेव पिंगळे पाहुन शिवीगाळ केली.त्यावेळी तुषार अनंत शेरमकर व चंद्रकांत नामदेव पिंगळे यांच्यात बाचाबाची सुरु झाली आर्यन तुषार शेरमकर यांने फिर्यादी यांचे डोक्यावर धारधार शस्त्राने वार करुन काठीने मारहाण केली. तुषार अनंत शेरमकर यांने त्याच्या हातात असलेली लाल मुठठीची सुरी फिर्यादी यांचे डावे हातावर मारली तुषार अनंत शेरमकर,सुजल दिपक पाटील यांने फिर्यादी यांना लाथ व काठीने मारहाण केली अनंत शेरमकर याने फिर्यादी यांचे पाठीवर वीट मारली यांची पत्नी तन्मयी शेरमकर यांनी चंद्रकांत पिंगळे यांचे उजव्या हाताच्या बोटावर उपट टाकली तसेच चंद्रकांत पिंगळे हे सदर ठिकाणाहुन गाडीचे बाजुला जात असताना चंद्रकांत पिंगळे यांची पत्नी छाया हिस तुषार शेरमकर याने अश्लिल शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली व सदर ठिकाणी चंद्रकांत पिंगळे यांने लावलेली कुर्डूस स्टँड येथिल लोखंडी फ्रेम येथिल तटकरे यांचे बॅनर तुषार शेरमकर यांनी फाडला त्यानंतर चंद्रकांत पिंगळे गाडीमध्ये बसले तेव्हा तेथे रुतिक विनोद पाटील यांने चंद्रकांत पिंगळे यांचे गाडीवर लाथ मारुन सुजल पाटील यांने गाडीचे डाव्या साईटला दगड मारले. वर्षा शेरमकर यांनी लाथा बुक्क्या मारल्या .
याप्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात २४/२०२४, भा.द.विं.१४३,१४७,१४९,१४८,३२३,३२४,५०४,५०६,५०९,४२७ न्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून अधिक तपास अधिक पोयनाड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे हे करीत आहेत.