अलिबाग, अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापुर येथे मॅग्झीमेा गाडीची मोटर सायकलला ठोकर लागून अपघात झाला असून या अपघातात नितीन सुधाकर म्हात्रे, संगीता मधुकर म्हात्रे, सलोनी नितीन म्हात्रे (सर्व राहणार धाकटे शहापुर) जखमी झाले आहेत.याबाबतची फिर्याद संगीता मधुकर म्हात्रे यांनी सागर सदानंद पाटील (रा.धेरंड पो.मोठे शहापुर ) याच्या विरोधात पोयनाड पोलीस ठाणे येथे दिली आहे.

अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापुर गाव हद्दीतील म्हसोबा मंदीराजवळील वळणावर मोटार सायकल क्रंमाक एम एच 06 ए ई 4359 वरील मोटार सायकल चालक फिर्यादी संगीता मधुकर म्हात्रे व पुतणी असे धाकटे शहापुर ते शहाबाज असे जात असताना पेझारी बाजुकडुन धेरंड कडे जाणारा मॅग्झीमो गाडी नं. एम एच 06 बी ई 1537 वरील चालक सागर सदानंद पाटील त्याचे ताब्यातील मॅग्झीमेा गाडी रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने, बेदरकारपणे, रस्त्याचे रॉग साईडला चालवुन फिर्यादीचे मोटार सायकलला समोरुन ठोकर मारुन अपघात करुन अपघातात फिर्यादी त्याचे दिर व पुतणी यांना लहान व मोठया स्वरुपाच्या दुखापती करुन अपघाताची खबर न देता व जखमींना कोणतीही उपचाराची मदत न करता पळुन गेला.सदर अपघातातील जखमी यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोयनाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 24/2024 भा.दं.वि.क. 279 , 337, 338 , मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कल्पेश नलावडे हे करीत आहेत.