पत्नीवर गोळी झाडून केली हत्त्या, फरार पतिच्या मुसक्या आवळल्या

कर्जत, गणेश पुरवंत

कर्जत तालुक्यातील शिरशे ग्रामपंचायत हद्दीतील आडीवली सांगवी दरम्यान पतीने पत्नीला ठासणीच्या बंदुकीतून गोळी मारून ठार करून हत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आवघ्या काही तासात फरार पतीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले असुन, कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर .या घटनेला घटस्फोटाची किनार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाने तालुका मात्र हादरून गेला आहे.

कर्जत तालुक्यातील शिरशे ग्रामपंचायत हद्दीतील आडीवली सांगवी रस्त्यावरील परिसरात सकाळी दहा वाजण्याचे सुमारास मोटारसायकलवरून जात असलेल्या महिलेवर तिच्याच पतीने बंदुकीची गोळी झाडून तिला जीवेमारण्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील आवळस नेवाळीवाडी येथे राहणारा चंद्रकांत वाघमारे वय वर्ष ४० याने पत्नी धोंडिबाई चंद्रकांत वाघमारे वय वर्ष ३२ हिला घटस्फोट दिल्यानंतर पत्नी धोंडिबाई ही पती पासून दूर भाऊ, महादू रंघुनाथ वाघमारे खांडपेवाडी येथे राहत होती. गेली दहा वीस दिवस झाले पत्नी परत घरी येण्याचे नाव घेत नसल्याने त्रस्त असलेला आरोपी चंद्रकांत याने पत्नीला शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष भोईर यांच्या शिरशे येथील निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावले होते. तर मयत पत्नी धोंडिबाई ही आपला भाऊ महादू रघुनाथ वाघमारे याच्या मोटारसायकलवरून सकाळी नऊ वाजताच भोईर यांच्या निवासस्थानी पोहचली होती. यावेळी तिथे चंद्रकांत व आणखी एक व्यक्ती सोबत होती. तर सतत मारहाण व शारीरिक मानसिक त्रास देऊन छळवणूक करणाऱ्या आपल्या पती सोबत आपल्याला यापुढे एकत्र राहायचे नाही तर पतीनेच स्वतःहून आपल्याला वेगळे करून घटस्फोट दिल्याचे मयत पत्नी धोंडिबाई हिने भोईर यांना सांगितले. तर भोईर यांच्या मध्यस्थी नंतर दोघांमधील वाद मिटत नसल्याने, तेथून आरोपी चंद्रकांत वाघमारे हा निघून पत्नीच्या घराच्या मार्गावर जावून मोटारसायकल उभी करून पत्नीची वाट पाहत होता. दरम्यान काही वेळा नंतर समोरून मोटारसायकलवरून भावाच्या सोबत आलेल्या पत्नीला अडवण्याचा प्रयत्न केला असता, पत्नी धोंडिबाई यांच्या मोटारसायकला अपघात घडला व रस्त्यावर पडलेली पत्नी धोंडिबाई ही उभी राहत नाही तोच चंद्रकांत याने पत्नीवर शिकारी साठी वापरण्यात येत असलेल्या लांब असलेल्या ठासणीच्या बंदुकीची गोळी झाडली. गोळी हाताला व पोटात लागल्याने धोंडिबाई हीचा जागीच मृत्यू झाला. तर बंदूक घेऊन पती चंद्रकांत हा घटनास्थळाहून फरार झाला. तर मयत धोंडिबाई हिचा भाऊ मोटारसायकल पडल्याने किरकोळ जखमी झाला. सदर घटना ही सोबत असलेल्या प्रत्यक्ष दर्शनी मयत धोंडीबाई हिचा भाऊ महादू रघुनाथ वाघमारे याने प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे. सदर खुनाच्या घटनेची माहिती ही कर्जत पोलीसांना मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस टीम सह घटना स्थळी पोहचून, मयत मृतदेह कर्जत उपजिल्हा रूग्णालय येथे नेण्यात आला. तर फरार आरोपी चंद्रकांत वाघमारे याच्या शोधकामासाठी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून, पाठवण्यात आली. तर काही तासातच नेरळ पोलीस टीमला फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page