उरण, विरेश मोडखरकर
जागतीक नागरी सरक्षण दिनानिमित्त वीर वाजेकर कॉलेज फुंडे, उरण या ठिकाणी जागतीक नागरी सरक्षणदिन साजरा करण्यात आला. सदर ठिकाणी ना. सं. स्वयंसेवकांकडून विविध प्रकारची प्रत्येशिके दाखवण्यात आली. यावेळी 15 स्वयंमसेवकानी प्रत्येशिक दाखवणेसाठी सहभाग घेतला.
नागरी सौरक्षण दल स्थापित करून, सामान्य नागरिकांच्या जीवाचे सौरक्षण करण्याचे काम सामान्य नागरिकांनमधून तयार झालेल्या नागरिकांकडूनच करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये स्वयंसेवक तयार करण्यात येत आहेत. या स्वयंसेवकाच्या माध्यमातून येणाऱ्या विविधता आपत्तीमध्ये नागरिकांना सुरक्षित करण्याचे काम करण्यात येत असून, प्रत्यक्ष आपत्तीमध्ये कशाप्रकारे मदतीचा हात पुढे करावा, तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये संयमीतपणे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे राज्यभरातून नागरी संरक्षण दलामार्फत गावागावात नागरी संरक्षण दलाची चळवळ मोठ्या प्रमाणावर राबविण्यात प्रशासनाला यश येत आहे. १ मार्च हा दिवस नागरी सौरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस उरणमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. येथील वीर वाजेकर कॉलेज, फुंडे येथे विविध प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक यांना नागरी सौरक्षण दलाचे उद्दिष्ठट्य पटवून देण्यात आले. १५ स्वयंसेवकांनी यावेळी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेऊन, उपस्थित्यांची मने जिंकली. यावेळी उरण ऑफिस कर्मचारी म. के. म्हात्रे (सं उ नि ), शशीकांत शिरसाठ (स उ नि ), संजय नांदगावकर (वाहन चालक ), नामदेव म्हात्रे (वाहन चालक ) यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम ठिकाणी आमोद ठकर सर (मुंबई विद्यापीठ समन्वयक) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अग्निशमन विभाग सिडको बोकडवीरा उरण यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.