कर्जत, गणेश पुरवंत
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सुधाकर घारे फाउंडेशन व कर्जत तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुक्यातील वकील व डॉक्टर महिलांचा सन्मानाचा सोहळा कार्यक्रम हा कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला.
कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सुधाकर घारे फाउंडेशन व कर्जत तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुक्यातील वकील व डॉक्टर महिलांचा सन्मानाचा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील डॉक्टर , वकील महिला भगिनी जमल्या होत्या. या सन्मान सोहळ्याप्रसंगी एका बाजूला घर सांभाळून दुसरीकडे सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा जीव वाचवणाऱ्या महिला शक्तीचा सलाम करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ही संकल्पना मांडली. दरम्यान डॉक्टर व वकील महिलांचा सन्मान आजवर कुठल्याही राजकीय पक्षाला जमला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट कर्जत महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे यांनी आपल्या प्रस्तविकातुन म्हटले आहे. तर जागतिक महिलादिनी कर्जत तालुक्यातील वकील व डॉक्टर महिलांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात येतोय ये कौतुकास्पद आहे. मुळात असा सन्मान याआधी कधी झाला नाही त्यामुळे आज खरंच आनंद होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी कायम महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळेच आम्हा महिलांच्या पंखांना भरारी मिळत असल्याचे कौतुक उपस्थित वकील महिला भगिनी यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी महिलांमध्ये उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. तर यासह उपस्थित वकील व डॉक्टर महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित वकील व डॉक्टर महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतानाच जेवढ काम आम्ही पक्षासाठी करतो त्यापेक्षा जास्त काम महिला शक्ती करते हे आमच्यासाठी अभिमानस्पद असल्याचे प्रतिपादन सुधाकर घारे यांनी केले. सदर सन्मान सोहळा कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तथा सुधाकर घारे, ज्येष्ठ नेते अशोक भोपतराव, राजेंद्र निगुडकर, कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, शिवाजी खारीक, भरत भगत, स्वप्नील पालकर, दीपक श्रीखंडे, महिला आघाडीच्या कर्जत तालुकाध्यक्ष रंजना धुळे, विधानसभा प्रमुख पूजा सुर्वे, कर्जत शहराध्यक्ष मधुरा चंदन, नेरळ शहराध्यक्ष राजश्री कोकाटे, नेरळ शहर उपाध्यक्ष अंकिता मोरे, युवती तालुकाध्यक्ष सुचिता लोहकरे, माथेरान शहराध्यक्ष स्वाती कुमार, युक्ता भोपतराव, डॉक्टर सेलच्या फिजा तांबोळी, आदींसह डॉक्टर व वकील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.