महिला दिनांनिमित्त आदिवासी महिलांची वैद्यकीय तपसणी

उरण, मनोज ठाकूर

जागतिक महिला दिनाचे औचीत्या साधून 9 मार्च 2024 रोजी डीव्हाईं फॉण्डेशन सिवूड नेरूळ,वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने विंधणे आदिवासी वाडी, उरण येथे मोफत आरोग्यतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. महिला दिन जगभरात साजरा होत असताना, वाड्या-पाड्यांवरील कष्टकरी महिला यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. या गोष्टीचा विचार करून, या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे शिबीर भरवण्यात आले होते.

उरण, विंधणे वाडी येथे भरविण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 119 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरा साठी डॉ.अंकिता आणि डॉ.वृत्ती (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ.धृत, डॉ.हर्षवर्धन ( बालरोगतज्ञ), डॉ.व्यंकट (MD मेडीसिन) यांनी आपली सेवा देत महिला आणि बालकाची तपासणी केली. यावेळी 24 आदिवासी बांधवांचे इसीजी काढण्यात आले.तर 50 बांधवांचे मधुमेह तसेच रक्त तपासणी करून, ज्या रुग्णांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्यांना डॉ.डी.वय.पाटील हॉस्पिटल नेरूळ येथे मोफत उपचार देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांना नेण्याची व आणण्याची व्यवस्था हॉस्पिटल करेल असे समन्वयक राजेश डोके यांनी सांगितले यावेळी सांगितले आहे. दरम्यान डीव्हाईं फॉण्डेशन सिवूड नेरूळ,वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे कौतुक करण्यात येत आहे. जगभरात महिलांदिन साजरा होत असताना, वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी महिला दुर्लक्षित रहात आहेत. तर त्यांच्या दैनंदिन जीवनात पोटाची खळगी भरण्यासाठी होत असणाऱ्या संघर्षामुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे बळावणारे आजार पाहता अशा महिलांसाठी आरोग्य शिबिराची गरज ओळखून हे शिबीर घेण्यात आले होते. यामध्ये लहान बालकांनाही तपासुन पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था आयोजककडून करण्यात आली होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page