आदिवासी बांधवांना मोफत आरोग्य विषयक सल्ला आणि हिमोग्लोबिन तपासणी

उरण, मनोज ठाकूर

इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखा आणि वनवासीकल्याण आश्रम उरण यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कादेवी आदिवासी वाडी, उरण. येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिर आणि मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी बहुसंख्या आदिवासी बांधवांनी आपले हिमोग्लोबिन चेकअप करून घेतले.

कार्यक्रमासाठी इंडियन फार्मासिटिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश शहा, आयपीए सदस्य सुरेश कुमार चौधरी, विजय घाडगे, आय.पी. ए सदस्य तथा वनवासी कल्याण आश्रम चे अध्यक्ष मनोज ठाकूर, वनवासी कल्याण आश्रम जिल्हा हितरक्षा प्रमुख मीराताई पाटील, दीपक गोरे, ऍडवोकेट आकाश शहा, वर्षा अधिकारी आणि कुणाल सिसोदिया उपस्थित होते. यावेळी 49 आदिवासी बांधवांनी हिमोग्लोबिन तपासुन घेतले. विशेष म्हणजे यात लहान मुलांनी देखील स्वतःहुन आपले रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण तपासून घेतले. बरेचसे आदिवासी बांधव यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण नियमित पातळीपेक्षा फार कमी आढळले त्यांना रक्त वाढीच्या गोळ्या इंडियन फार्मास्युटिकल असो. तर्फे मोफत देण्यात आल्या. तर पौष्टिक आहार म्हणून प्रोटीन पावडर, दूध पावडर, नाचणीचे पीठ आणि इतर आवश्यक असलेले घटक मोफत देण्यात आले. आय पी. ए महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश शहा यांनी हिमोग्लोबिनची रक्तामधील आवश्यकता याविषयी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. आहारामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते देखील सांगण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page