अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे आराध्या संदानंद पोळे (6 वर्षे) व सार्थक संदानंद पोळे ( 3 वर्षे ) या दोघांचा दुपारी झोपेतच मृत्यू झाळ्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद शीतल नामदेव पोळे (किहीम आदिवासी वाडी, राहणार -बेलोरा , तालुका -पुसद यवतमाळ ) यांनी मांडवा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि शीतल नामदेव पोळे, सदानंद नामदेव पोळे हे आपल्या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत एक वर्षापासून कामास आहेत . रविवारी दुपारी जेवल्यानंतर आराध्या व सार्थक हे झोपले होते. सायंकाळी उठत नाही म्हणून त्यांना उठविण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता दोघेही बेशुद्ध अवस्थेत दिसली. तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. आराध्या व सार्थक या दोघांचे मृताचे कारण जलद गतीने मिळावे यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार त्यांचे शव विच्छेदन करण्यासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती मांडवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लांडे यांनी दिली आहे.