उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी;उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश

उरण, वैशाली कडू

उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्या मागणीला यश आले असून अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहेत.

उरण तालुक्यात सिडको द्रोणगिरी व उरण पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जचे साम्राज्य उभे राहिले आहे. शासकीय यंत्रणेचे अर्थपूर्ण हीतसबंध असल्याने जाहिरातीची एजन्सी चालविण्यार्‍यांवर कारवाई होत नाही. काही दिवसापूर्वी मुंबई घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेला तर कित्येकजण जखमी झाले आहेत. या होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. उरण तालुक्यातही अशाप्रकारे अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज लाणण्यात आले होते. मात्र या अनधिकृत होर्डिंग्जवर ठोस कारवाई करण्यात येत नाही.अशाप्रकारे लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर त्वरित करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती.या मागणीला यश आले असून काही ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहे.

उरण ते जेएनपीटी वसाहत स्ंकुलापर्यंतच्या मार्गावरील होर्डिंग्ज उतरविण्यात आले असले तरी होर्डिंग्ज उतरविणाऱ्या कामगारांनी कोणत्या अधिकार्‍याच्या सांगण्यावरून वीर वाजेकर विद्यालयाच्या समोरील नवघर उड्डाणपुला जवळील होर्डिंग्ज अजूनही जाहिरातीसह जाणीवपूर्वक जपून ठेवला आहे. याची चर्चा आत्ता नाक्यांनाक्यावर सुरू आहे.
सोमवार दि. 13 अनधिकृत होर्डिंग्ज मे 2024 रोजी घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120×120 फुटाचं होर्डिंग कोसळल्याने तब्बल 14 जणांचा हकनाक जीव गेला होता. यापूर्वी दि. 18 एप्रिल 20 रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात होर्डिंग पडून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. उरणपनवेल मार्गावर लावण्यात आलेल्या आंनधिकृतपणे होर्डिंगने सुद्धा 2 ते 3 वर्षापूर्वी नवीन शेवा गावा जवळ-1,बोकडविरा चारफाटा येथे-2 तर वायु विद्युत केंद्र वसाहत स्ंकुला समोरील-1आदि ठिकाणी लावण्यात असलेल्या होर्डिंगने सुद्धा या मार्गावर वादळी हवामानात भर पावसाळ्यात लोटांगण घातले होते. यामध्ये जरी मोठी दुर्घटना घडली नसली तरी होर्डिंग्जच्या बांधकामचा दर्जानित्कृष्ट दर्जाचा होता हे उघड झाले होते.
आजही उरण द्रोणगिरी शहर परिसर उरण पनवेल मार्गावर आशा प्रकारचे होर्डिंग्ज उभे आहेत त्यामध्ये अनेक अनधिकृत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी “उरण तालुका मराठी पत्रकार संघाने” वेळोवेळीकेली होती याची दखल घेत अनधिकृत सिडको प्रशासनाकडेव सार्वजनिक बांधकाम खात्याने घेत व घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120×120 फुटाचं होर्डिंग मुळे झालेली दुर्घटना याची दखल घेत शासनाने काढलेल्या आदेशानुसार उरण पनवेल महामार्गावरील लावण्यात आलेल्या मोठमोठया होर्डिंगवरील जाहिरातीचे बॅनर उतरविण्यात आले आहेत, तरी सुद्धा लोखंडच्या अँगलचे स्ट्रक्चर मात्र स्ट्रक्चरल ऑडिट न करताच उभे आहेत. परंतु अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण सहकार्यामुळे होर्डिंग्ज उतर्विणार्‍या कामगारांनी कोणत्या अधिकार्‍याच्या सांगण्या वरून वीर वाजेकर विद्यालयाच्या समोरील नवघर उड्डाणपुला जवळील होर्डिंग्ज अजूनही जाहिरातीसह जाणीव पूर्वक जपून ठेवला आहे. याची चर्चा आत्ता नाक्यानाक्यावर सुरू आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page