उरण, प्रतिनिधी
कोप्रोली नाक्यावर गुप्ता सँडविच आणि ज्युस सेंटर च्या दुकानात गँस सिलिंडर चा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी ( दि२८ ) दुपारी ४ च्या सुमारास घटना घडली.या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दुकानांचे छप्पर हवेत उडाले,आगीचे व धुराचे लोट हवेत उडाले.मात्र दुकानदार थोडक्यात बचावला आहे.या घटनेची माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
डोंबिवली शहरात स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच उरण तालुक्यातील गजबजलेल्या कोप्रोली नाक्यावरील गुप्ता सँडविच आणि ज्युस सेंटर च्या दुकानात दुकान चालकाच्या दुर्लक्षित पणामुळे गँस सिलिंडर चा स्फोट होण्याची घटना मंगळवारी ( दि२८ ) दुपारी ४ च्या सुमारास घटना घडली.या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दुकानांचे छप्पर हवेत उडाले,आगीचे व धुराचे लोट हवेत उडाले.या स्फोटात नागरी वस्ती तील रहिवाशांच्या कानपिचक्या बसल्या तसेच बाजूच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले.मात्र दुकानदार थोडक्यात बचावला आहे.या घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.सध्या रहिवाशी भिंतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.