कर्जत, गणेश पुरवंत
ज्या हातरीक्षा चालकांनी अमानवी प्रथेविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेऊन वैचारिक लढा दिला त्याला तब्बल 12 वर्षानंतर यश आले आहे.नगरपरिषदेकडून ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट श्रमिक हातरीक्षा चालक मालक संघटनेला स्वाधिन केला असून या पुढे हातरीक्षा चालक हे आता ई रिक्षा चालक .याबाबत येथील कम्युनिटी सेंटर येथे कार्यक्रम आयोजित करून संघटनेकडून पालिकेचे धन्यवाद मानले आहेत.
तब्बल सहा दशकानंतर श्रमिक हातरीक्षा चालकांना न्याय मिळाला याचा आनंद व्यक्त करण्यात आला.५ डिसेंबर 22 ते ४ मार्च 23 या तीन महिन्यांच्या कालावधीत पहिला पायलट प्रोजेक्त यशस्वी करण्यात पालिकेला यश आले होते.त्यानंतर हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर दुसरा पायलट प्रोजेक्त 26 डिसेंबर 23 रोजी सुरू करण्यात आला या पहिल्या आणि दुसऱ्या पायलट प्रोजेक्तसाठी ठेकेदाराला या रिक्षा चालविण्यात दिल्या होत्या त्यामुळे हातरीक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी होती.याबाबत त्यांनी सतत नगरपालिकेत विचारणा केली पण ज्या वेळेस 20 ई रिक्षा चालविण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर या रिक्षा आम्हास चालविण्यास द्याव्या अशी मागणी ई रिक्षा चालक मालक संघटनेने केल्यावर त्यास पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.36 हातरीक्षा चालकांना बॅच मिळल्यानंतर त्यातील 20 जणांची नियुक्ती संघटनेमार्फ़त करून त्यांच्या नावे ई रिक्षा देण्यात आल्या. 11 जून 24 रोजी कम्युनिटी सेंटर येथे श्रमिक हातरीक्षा चालक मालक संघटनेमार्फ़त उदघाटन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना याचिकाकर्ते सुनील शिंदे हे भावुक होत म्हणाले की काही श्रमीक हातरीक्षा चालक माझ्याकडे येऊन बोलले की आमच्या सर्व पिढ्या हातरीक्षाच चालवायच्या का?आम्हाला सन्मानाने कधी जगता येणार ?याचा पूर्ण विचार करत मी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला तिथे यश मिळाले नाही,म्हणून सत्र न्यायालय,उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तब्बल तेरा वर्षाच्या लढ्यानंतर अखेर आज यश मिळाल्याने मी समाधानी होत माझ्या हातरीक्षा चालकांना अमानवी प्रथे पासून मुक्ती दिली आहे अशी भावना व्यक्त केली.तर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे म्हणाले की,हा पायलट प्रोजेक्त यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे राहणार आहे.जेवढे चालक महत्वाचे तेवढेच नागरिक सुद्धा महत्वाचे आहेत.नियमात रिक्षा सुरू राहतील.जो लढा श्रमिक हातरीक्षा चालकांनी दिला त्याला यश आले आहे आणखी सहा महिने हा पायलट प्रोजेक्त सुरू राहणार आहे.