उरण, विरेश मोडखरकर
वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. पण आता आपल्या पर्यावरणाच्या दीर्घायुष्यासाठी काहीतरी करावे म्हणून डॉ.आरती म्हात्रे व उलवे येथील डॉक्टर महिला नवीन संकल्पना घेऊन ह्या वर्षी पर्यावरण पूरक वट-वृक्षारोपण व संवर्धन करायचा संकल्प केला आहे.
वटपौर्णिमेला वाणा सोबत 5 मैत्रिणींना वडाचे झाड देऊन त्याचे संवर्धन करून वाटपौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प उलवे, नवीमुंबई येथील डॉक्टर महिलांनी हाती घेतला आहे. वटपौर्णिमेच्या व्रताचे वाण म्हणून वडाचे झाड देऊन, त्याचे संवर्धन करून पुढील वर्षी आजून अनेक महिलांची साखळी बनवत इतर मैत्रिणींना झाडे देऊन, वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे पती परमेश्वराच्या रक्षणासोबतच पर्यावरणाचे रक्षण देखील होणार आहे. डॉ. आरती म्हात्रे, डॉ. संजीवनी मोरे, डॉ. अदिती वानखेडे, डॉ.स्वाती रुपदास, डॉ.नीलम गुजर यांनी हा उपक्रम हाती घेतला असून, वाटपौर्णिमे निमित्त प्रत्येकी 1 झाड लावून वट-वृक्षारोपण व संवर्धन या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे.