केळवणे, अजय शिवकर
सध्याच्या काळात विकासाच्या नावाने भू-उत्खलन आणि आणि वृक्षतोड यामुळे वाढते तापमान ही जागतिक समस्या बनली आहे.. म्हणूनच या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचा हा -हास भरून काढण्यासाठी प्रत्येक माणसाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, तरच ‘पृथ्वीचे वाढते तापमान’, नियंत्रित करता येईल.
‘निसर्ग संवर्धन’ ही सध्या काळाची गरज आहे, हे ओळखून केळवणे गावातील विनय धर्माजी घरत या तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या अवचित्ताने गावा शेजारील ओसाड डोंगरावर १०० झाडे लावून, सर्व समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. या चांगल्या कामासाठी त्याला सन्नी माळी ,वृषभ घरत, ओमकार माळी, रुतेश घरत, रितेश म्हात्रे, विनय कडू, अथर्व घरत, अंश मोकल, आणि यश शिवकर या सर्वांनी वृक्षारोपण करण्यास मदत केली. या लागवडी मध्ये फणस , आंबा, जांबुळ, चिकू सारखी फळझाडे तर करंज, अर्जून, वड , पिंपळ सारखी जंगली झाडांचे वृक्षारोपण केले . डोंगर, माळरानावर ही झाडे जेव्हा वाढतील, तेव्हा पशूपक्षांना चारा, निवारा, मिळेल, मानवांना फळे, फुले, सावली मिळेल, आणि हिरवागार निसर्ग वाढीमुळे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन होईल. हे कार्य करणाऱ्या विनय घरत या तरुणाला 25 व्या वाढदिवसानिमित्ताने शंभर झाडे लावल्यामुळे शंभर वर्ष आयुष्य लाभाव् असा प्रत्येक जण आशीर्वाद देत आहे. सर्वत्र त्याचे कौतुक देखील होत आहे.