उरण, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील मोठी जुई गावची चारशे वर्षांपासुन ओळख असणारे पिंपळचे झाड कोसळले. गावात प्रवेश करतेवेळीस हे झाडं आपल्या विस्ताराने सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. एका टेकडीवर वसलेल्या मोठीजुई या गावात आजवर अनेक बदल झाले आहेत. मात्र या झाडाने नेहमीच येथील ग्रामस्थ्यांना आपल्या छायेमध्ये विसावा दिला आहे. अनेक सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, एकत्र भेटणे या झाडामुळे आजवर होत होते. यामुळे हे झाड गावासाठी महत्वाचे होते. मात्र आज हे झाड कोसळल्याने, गावाचा आधार हरपला असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तर अनेक पक्षांचं आश्रय स्थान देखील नष्ट झाले आहे.