उरण, विरेश मोडखरकर
तालुक्यातील सकरवा पत्रकारांच्या मुलांचा सत्कार जेएनपीए ने करावा यासाठी प्रयत्न केला जाणार

शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावी ही दोन वर्षे महत्वाची मानली जातात. या दोन वर्षाच्या प्रगतीनुसार मुलाचे पुढील भवितव्य ठरत असते. यामुळे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार करण्याची प्रथा आमलात आली आहे. यातूनच उत्तम टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अधिक सन्मान केला जातो. अशा सन्मान सोहळ्याच्या बातम्या प्रसारीत करून, विशेष प्राविन्या मिळवणाऱ्या मुलांना सर्वांसमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. मात्र पत्रकाराच्या मुलांनी केलेली कामगिरी समाजापुढे येत नाही.

यासाठी जेएनपेए विश्वस्त दिनेश पाटील यांनी पत्रकार घनशाम कडू यांचा चिरंजीव विहंग कडू याने इयत्ता दहावीमध्ये ९४% गुण मिळवू, शाळेत द्वितीय आणि तालुक्यात पाचवा आल्याबद्दल सत्कार कार्यक्रम केला आहे. यावेळी सर्व पत्रकार बंधुना एकत्र करून, हा सत्कार करण्यात आला. तर या प्रसंगी बोलताना दिनेश पाटील यांनी सर्वच पत्रकार बंधुंच्या मुलांनी विविधता क्षेत्रामाफहये काहीनाकाही उत्तम कामगिरी केली आहे. मात्र या मुलांचा सत्कार होत नसल्याची खंत व्यक्त करत, अशा पत्रकाराच्या मुलांचा सत्कार जेएनपीए प्रशासनाकडून करण्यात यावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे पत्रकाराचा सत्कार होऊन, त्यांच्यासाठी जेएनपीएच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटा आता मोकळ्या होणार आहे. विश्वस्त दिनेश पाटील यांनी केलेल्या सत्काराबाबत पत्रकारानी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.