उरण, विरेश मोडखरकर
० परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून लुटले पैसे.
० लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रताप.
० जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा दाखल.
नेरुळ, सिवूड्स येथे राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याला तब्बल ३ कोटी ३० लाखांचा उरणमधील जुगानू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी-बबलीच्या जोडीने गंडा घातला आहे. परदेशात मुलांना शिक्षण आणि डॉक्टर दांपत्याला नोकरी देतो असे सांगून ही फसवणूक केली असल्याचे, एनआरआय पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. "लिव्ही ओव्हरसीज स्टडीज" या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा गंडा घालण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुक झालेले डॉक्टर दाम्पत्य सिवूड्स, नवीमुंबई येथे रहात असून, उरण करंजा भागात राहणाऱ्या जुगनू चिंतामाण कोळी आणि तेजस्वी जुगनू कोळी या बंटी, बबलीच्या जोडीने डॉक्टर दांपत्याला खोटे अमिश दाखवून टप्याटप्याने तब्बल ३ कोटी ३० लाखांची उकल केली आहे. जुगनू आणि तेजस्वी कोळी यांचे अपत्य याच डाक्टरांच्या प्रसूतीगृहामध्ये जन्मास आले होते. यामुळे डॉक्टर आणि कोळी कुटुंब यांच्यात ओळख होती. जुगनू कोळी याची “लिवी ओव्हरसीज स्टडी” या नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ज्या माध्यमातून परदेशात शिक्षण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात. याच कंपनीच्या माध्यमातून हा अपहर करण्यात आला आहे. डॉक्टरांची दोनही मुलांचे १२ वि पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये जुगनू कोळी याच्या माध्यमातून सिंगापूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यामुळे कोळी कुटुंबाबात डॉक्टर दांपत्याला अधिक विश्वास संपदान झाला होता. मुलांचे सिंगापूर येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठामध्ये कमी खर्चाचेमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून, डॉक्टर दांपत्याचा होकार मिळवला. यासाठी त्याने प्रथम ७ लाख ५६ हजार रुपये डॉक्टर दांपत्याकडून काढून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ऐवजी जर्मनी येथे मुलांची व्यवस्था करतो आणि डॉक्टर दांपत्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून, ८८ लाख ५३ हजार घेतले. मुलांच्या प्रवेश प्रक्रियेला वेळ लागत असल्याने डॉक्टरांकडून सातात्याने चौकशी केली जात होती. तर केलेल्या प्रक्रियेबाबत कागदपत्रांची मागणी देखील करण्यात येत होती. मात्र कोळी दांपत्याला फसवणूकच करायची असल्याने, कोणतीच माहिती देण्यात आली नाही. याउलट आरोपी जुगनू केली याने सप्टेंबर २०२३ ला जर्मनिमधील व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रामचा अवधी संपला असल्याचे सांगितले. यांनंतर डॉक्टर दांपत्याने मुलांना ‘कृएशिया’ येथे कोळी दांपत्याच्या सल्ल्याने पाठवण्याचा निर्णय घेताला. यासाठी पुन्हा १ कोटी २७ लाख २६ हजार डॉक्टर दांपत्याने कोळी
दांपत्याला दिले. यांनंतर या बंटी, बबलीने भारतीय चालनाचे युरो चालनामध्ये एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने आणखी २७ लाख असे आजपर्यंत ३ कोटी ३० लाख उकळले आहेत. याबाबत अनेकदा विचारना करून देखील काहीच माहिती अथवा कागदपत्रांची पूर्तता आजवर केली नसल्याने, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने, डॉक्टर दांपत्याने अखेर “लिव्ही ओव्हरसीज स्टडी” या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्याचे संचालक जुगनू चिंतामण कोळी त्याची पत्नी तेजस्वी जुगनू कोळी यांच्या विरोधात नवीमुंबई, एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणूकबाबत गुन्हा नोंद केली आहे.
फसवणूकीच्या या सर्व प्रकारामध्ये डॉक्टर दांपत्यांच्या दोनही मुलांचे “लिव्ही ओव्हरसीज स्टडी” या कंपनीकडून दोन शैक्षणिक वर्षांचे नुकसान करण्यात आले असून, मुलांचे घेतलेले मूळ कागदपत्रे देखील दिलेले नाहीत. यामुळे मुलांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार आहेत. यासाठी अशा फसवणूक करणाऱ्या संस्थांपासुन मुलांच्या भवितव्यासाठी तळमळ बाळगत आपल्या आयुष्याची पुंजी अथवा कर्ज काढून मुलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पालकांनी सावध रहाण्याची नितांत गरज आहे.