उरण, विरेश मोडखरकर
२७ जुलै रोजी उरणच्या वेशिवरव तरुणीचा मुतदेह सापडला होता. दोन दिवसांपूर्वी बेपत्ता असणाऱ्या यशश्री शिंदे हिचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते. यशश्रीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह झूडूपात फेकला होता. यांनंतर नागरिकांनी एकच आक्रोश करत आरोपी दाऊद शेख याला अटक करण्याची मागणी लावून धरली होती. पोलिसांनी या आरोपीला कर्नाटका येथून अटक देखील केली. आज या आरोपी दाऊद शेख याला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाल्याने पुढील तपासासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापल्यानंतर महिला सुरक्षित आहेत का? हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे विविध राहकीय पक्ष, नागरिक, सामाजिक संस्था एकत्र येत यशश्रीच्या मारेकऱ्याला अटक करण्यासाठी, रस्त्यावर उतरत जनाक्रोश केला होता. यांनंतर पोलिसांनी तपासाअंती या हत्याकांडातील आरोपी कर्नाटका राज्यातील दाऊद शेख असल्याचे ठाम केले. आणि दाऊद शेखला पकडण्यासाठी टीम रवाना केल्या. ३० जुलै रोजी दाऊदला ताब्यात घेतले असल्याचे पोलीस यंत्रणेने पत्रकार परिषद घेत सांगितले होते. आज या आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. जनतेचा उद्रेक पाहता न्यायलय परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. तर कुणीही अतिरेक करूनये यासाठी विशेष पथक देखी मागवण्यात आले होते. आरोपी दाऊद शेख याला न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायाल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.