पनवेल, प्रतिनिधी
बँकॉक येथे नुक्ताच झालेल्या आशिआई जलतरण स्पर्धेमध्ये पनवेल तेथे राहणाऱ्या कु. सारा अभिजित वर्तक या सहा वर्षीय जलतरणपटुने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सारा कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथे गेल्या १५ महिन्यांनापासुन समर्थ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. पनवेल येथील रेयान इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकणारी सारा अभ्यासात देखील हुशार असून, तिला जलतरणाची आवडत आहे. प्रशिक्षक समर्थ नाईक यांनी तिच्यामधील जलतरणाची चमक पाहून तिला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश देखील मिळाले. सारा हिने अवघ्या सहाव्या वर्षी अंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून आपली चमक दाखवली आहे. बँकॉक येथे झालेल्या आशिआई जलतरण स्पर्धेमध्ये साराने देशाचे नेतृत्व करत ३ रौप्य आणि दोन कास्य पदकांची कामाई करत देशाचे नाव उंचावले आहे. तिच्या या यशाचे श्रेय तिचे पालक आणि प्रशिक्षक समर्थ नाईक, ऋग्वेद पाटील, सुजल मढवी आणि प्रशांत ठाकूर यांना देण्यात येत आहे. कु.सारा अभिजित वर्तक ही पुढील स्पर्धामध्ये सहभाग घेऊन देशाला अधिक सन्मान मिळवून देणार असल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.