उरण, विरेश मोडखरकर
उरण तालुक्यातील 'उरण मेडिकल वेल्फेअर असोसिशन' ही डॉक्टर संघटना असून, या संघटनेची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष डॉ.घनशाम पाटील तर सचिव पदी डॉ.सत्या ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी इतर कार्यकारणीसुद्धा पदग्रहण सोहळ्यादरम्यान जाहीर करण्यात आली आहे.या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ.संजीव म्हात्रे यांनी सांभाळली.
उरण मेडिकल असोसिशन या डॉक्टर संघटनेच्या नव्या कार्यकारणीची निवड नुक्ताच करण्यात आली होती. यांनंतर या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उरणमधील 'भोईर गार्डन' येथे आयोजित करण्यात आला. हा कार्क्रम संघटनेचे मार्गदर्शक डॉ. दहिफळे, डॉ.सुरेश पाटील, डॉ.मंगेश डाके, डॉ.विकास मोरे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी सायंकाळी पार पडला. डॉ.संजीव म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी जुन्या कार्यकारणी सदस्यांना सन्मानीत करून, नव्या कार्यकरणीचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षपदी डॉ.घनशाम पाटील, सचिव डॉ.सत्या ठाकरे, खजिनदार डॉ.सचिन गावंड, क्रीडा सचिव डॉ.अतुल बोन्द्रे, क्रीडा उप सचिव डॉ.रोशन पाटील, सांस्कृतिक सचिव डॉ.रंजना म्हात्रे, उप सांस्कृतिक सचिव डॉ.शुभांगी मोकल, सीएमई सचिव डॉ.कृष्णा बोरकर, उप सीएमई सचिव डॉ.अनिकेत पाटील यांची निवड नव्या कार्यकारणीमध्ये करण्यात आली आहे. तर डॉ.सत्या ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संघटनेने सलग तिसऱ्यांदा सचिव पदी त्यांची निवड केली आहे. पदग्रहण सोहळ्या दरम्यान मावळतीचे अध्यक्ष डॉ.विकास मोरे यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव व्यक्त करत, सर्व साथीदारांचे आभार मानले. तर नावे अध्यक्ष डॉ.घनशाम पाटील यांनी आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेत बोलताना आपल्या प्रगतीमागे दोन महिला असून, यातील एक माझी आई आहे तर दुसरी पत्नी असल्याचे सांगितले. याचबरोबर उपस्थित सर्व मार्गदर्शक आणि सहकारी यांना पुढील कार्यात सोबत राहण्याची विनंती केली. यावेळी डॉ. संजीव म्हात्रे यांनी संघटनेसाठी केलेले कार्य आणि संघटनेच्या कार्यातील उत्तम सहभागामुळे विशेष आभार मानलेली. सोहळ्यानंतर निवड झालेल्या कार्यकारणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.