उरणमध्ये विद्यार्थ्यांनी केला विसर्जन घाटाची स्वच्छाता

उरण, विरेश मोडखरकर

  जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे एन.आय. हायस्कुल, उरण या शाळेमधील आर.एस.पी. विद्यार्थी व स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी गणपती विसर्जनानंतर विमला तलाव येथे अस्वच्छ झालेला परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानामधून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याचे काम शाळेकडून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी शाळेतील सोमीनाथ खरमाटे व मुकद्दर तडवी हे शिक्षक या उपक्रमात  विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. 
  शालेय जीवनापासुनच स्वछतेची शिकवण आणि आपला परिसर स्वछ ठेवण्याची आवडत मुलांमध्ये रुजवली गेली तर एक दिवस आपला देश नक्कीच 'स्वछ भारत' म्हणून ओळखला जाईल. यासाठी शाळांमधून स्वछतेचे धडे देणे आवश्यक आहे. असाच प्रयत्न उरणमधील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या एन.आय. हायस्कुल या विद्याल्याने केला आहे. नुक्ताच गणेशोत्सव संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाने साजरा केला गेला. हा उत्सव साजरा करत असताना, गणेश मूर्ती विसर्जन झाल्यावर प्रत्येक विसर्जन घाटावर अस्वच्छता पहायला मिळाली. उरण तालुक्यातील शहराच्या मध्यभागी असणाऱ्या विमाला तालावामधील विसर्जन स्थळी देखील मोठ्याप्रमाणात कचरा गोळा झाला होता. हा कचरा जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे एन.आय. हायस्कुलच्या आर.एस.पी. विद्यार्थी व स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी साफ करत स्वच्छता केली. विसर्जन झाल्यानंतर निर्माण होणारा कचरा तात्काळ साफ होतं नाही आणि यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तर स्वच्छता करून विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केल्यास, विद्यार्थ्यांमधून स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे येईल आणि देश स्वच्छ होण्यास मदत होईल, असे विद्याल्याच्या शिक्षकांनी म्हटले आहे. मुलांनी केलेल्या स्वच्छतेबाबत कौतुक केले जात आहे. 
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page