उरण, विरेश मोडखरकर
उरण विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या कडे दाखल केला आहे.यावेळी शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते.
मावळ लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना १३ हजार मते अधिक मिळाली होती.उरण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सोमवारी हजारो भाविकांची ग्रामदैवत असलेल्या श्री शांतेश्वरी व श्री रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आपल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माझा विजय निश्चित असून, प्रतीस्पर्धी भाजपा उमेदवार महेश बालदी याचा २५ ते ३० हजार मतांनी पाराभाव करेन असा विश्वास मनोहर भोईर यांनी दर्शविला. अर्जदाखल करण्यासाठी उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीतील शेका पक्षाचे राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांनी भाजपा उमेदवार महेश बालदी यांच्यावर निशाणा साधाला.