अलिबाग प्रतिनिधी, अमूलकुमार जैन
दिव्यांग आणि वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा
विधानसभा मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. अलिबाग मध्ये गृहमतदानासाठी एकूण ४८८ मतदार आहेत, यापैकी ४६९ मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड रोहा विधान सभा मतदार संघात गृह मतदान आज घेण्यात आले असून ४८८ पैकी ८५ वयावरील ज्येष्ठ मतदार आणि ४० टक्केहून अधिक प्रमाणात दिव्यांग मतदार असून यापैकी ४६९मतदारांनी आपला हक्क बजावला असून एकोणीस मतदारांसाठी १७नोव्हेंबर २०२४रोजी दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे. अलिबाग मुरुड रोहा विधान सभा मतदार संघात गृह मतदान आज घेण्यात आले असून ४८८पैकी ८५ वयावरील ज्येष्ठ मतदार आणि ४० टक्केहून अधिक प्रमाणात दिव्यांग मतदार असून यापैकी ४६९मतदारांनी आपला हक्क बजावला असून यामध्ये ४४२ ज्येष्ठ मतदार (८५ वयावरील )आणि २७दिव्यांग मतदार (४० टक्केहून अधिक प्रमाणात दिव्यांग) यांनी हक्क बजावला असून दिव्यांग मतदाराचे १००टक्के मतदान झाले आहे.
कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग आणि वयोवृद्दांनी मतदानाचा आज हक्क बजावला. अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अलिबाग विधान सभा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी त्यांच्या नेमून दिलेल्या पथक यांच्याकडून १५ नोव्हेंबर या दिवशी गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात यशस्वी झाले असून मतदानाची टक्केवारी ही ९६टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या वेळी ४६९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला झाली आहे. विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण ७ पथके, अलिबाग विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देवून मतदान घेण्यात येत आहे.त्यासाठी एकूण ३७ पथके कार्यरत असून यामध्ये १८५ कर्मचारी कार्यरत होती.
अलिबाग विधान सभा मतदार संघातील अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर हे समुद्र सपटीपासून जवळपास नऊशे फूट उचं असून ते चढण्यास्थी सहाशे पन्नास हुन अधिक पायऱ्या चढाव्या लागतात.एक पथक याने दोन मतदार यांच्यासाठी कनकेश्वर येथे तिथे असणाऱ्या दोन मतदारांना त्याचे हक्क बजावण्यास सहाय्य केले असल्याची माहिती सहायक निर्णय अधिकारी रोहन शिंदे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने ८५वर्षांवरील मतदार तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. :- मुकेश चव्हाण. निवडणुक निर्णय अधिकारी अलिबाग विधान सभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग.