उरणमध्ये जागतिक दिव्यांग अपंग दिन मोठ्या उत्साहात साजरा

उरण, वैशाली कडू

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आमदाकीची सर्व पेन्शन म्हणजेच 6 लाख रुपये दरवर्षी दिव्यांगाच्या मदतीसाठी सुपूर्द करणार

जागतिक दिव्यांग अपंग दिन उरणमध्ये मोठया उत्साहात जेएनपीए मल्टिपरपज हॉलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग अपंगांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे अफलातून सादर केले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपल्याला मिळणारी वर्षभराची पेन्शन ही आपण शेवटपर्यंत दरवर्षी दिव्यांगांच्या मदतीसाठी देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

आज मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे दिव्यांग सामाजिक संस्था, उरण यांच्यातर्फे कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी शेकापचे युवानेते प्रितम म्हात्रे, ओएनजीसी अधिकारी चांद, भावना आठवले, जेएनपीएचे सेक्रेटरी मनीषा जाधव, जैन, कामगार नेते भूषण पाटील, सीमा घरत, कमलाकर पाटील, किरण घरत, उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपंग व्यक्तीने गायन, मिमिक्री व मलखांब प्रात्यक्षिके दाखवीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ही कला बघून उपस्थित सदृढ माणसांनी जी आम्हांला न करता येणारी कला या जागतिक दिव्यांग दिनी अपंगांनी सादर केल्याची कबुली उपस्थितांनी दिली. यावेळी माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी आमदार असताना मिळणारे मानधन अपंगांना दिली होती. त्यानंतर आमदारकीची प्रत्येक वर्षाला मिळणारी ६ लाख रुपये पेन्शन दिव्यांग साठी मदत म्हणून सुपूर्द केली, त्याचा चेक आज सुपूर्द केले. आत्तापर्यंत मनोहरशेठ भोईर यांनी दिव्यांग बांधवांसाठी १ कोटी २० लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच दरवर्षी मिळणारी पेन्शन ही आपण अपंगांना देणार असल्याचे यावेळी सांगितले. मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारणा पेक्षा समाजकारण जास्त केलेला आहे, ते मी या पुढे चालू ठेवीन असे त्यांनी आवर्जून सांगितले, तसेच जेएनपीटी, ओएनजीसी व सिडको कडून सी एस आर फंड मिळवून ते दिव्यांगासाठी वापरून त्यांना स्वावलंबी करण्याचा माझा मानस आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मी प्रयत्न करणार असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. पण दुर्दैवाने म्हणावसं वाटतं की ज्यांना आपण दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले त्या व्यक्तीला जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांना शुभेच्छा द्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल. शेकापचे युवानेते प्रितम म्हात्रे यांनी आपण स्वतः अपंगांनी मलखांबाचे दाखविलेले प्रात्यक्षिक व गायनाची कला याचे तोंडभरून कौतुक करून आम्हांला ते शक्य होत नसल्याचे सांगितले. आज जागतिक अपंग दिन असला तरी अपंग ही सदृढ माणसाच्या पुढे कार्यात हिरिरीने पुढे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यांना यापुढे नोकरभरतीत प्राधान्य देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ओएनजीसी व जेएनपीएने यासाठी पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच अपंग व्यक्तीच्या नोंदणीसाठी आपण स्वतः संगणक, प्रिंटर्स व इतर मनुष्यबळ देण्यास तयार असल्याचे प्रितम म्हात्रे यांनी यावेळी सांगत. यापुढे कोणतीही अडचण असल्यास त्या सोडविण्यासाठी आपण आवाज द्या त्यासाठी मी कधीही तयार असल्याचे सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page