उरणचा १३ वर्षीय आर्य किशोर पाटील १८ डिसेंबरला करणार जागतिक विक्रम

उरण, विरेश मोडखरकर

उरण, केगाव-दांडा येथे राहणारा १३ वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमसाठी सज्ज झाला आहे. १८ डीसेंबर २०२४ रोजी हा विक्रम तो करणार आहे. धरमतर जेट्टी ते कासा खडक हे सागारी २४ किमी अंतर तो “बटरफ्लाय” या जलतरण प्रकारातून पोहून पार करणार आहे. यामुळे तो खुल्या समुद्रातील २४ किमी “बटरफ्लाय” प्रवाह पोहून जाणारा जगातील पहिला बाल जलतरणपटू ठरणार आहे. बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करणारा प्रकार असल्याने या विक्रमासाठी आर्य उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगरपरिषदेच्या जलतरण तलावामध्ये दररोज सहा तासांचा सरावं देखील करत आहे. आर्य उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेनट स्कुलमधील आठवी इयत्तामध्ये शिकत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page