अलिबाग, अमूलकुमार जैन
शासन तातडीची सेवा देण्यात असमर्थ ठरली अवलोकन करण्याची गरज
मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठ मधील उमेश गोबरे यांच्या मालकीची एक मजली इमारती मधील खालच्या गाळ्यातील विजय जैन यांच्या कपड्यांच्या दुकानाला सुरवातीला आग लागली ही आग एवढी मोठी होती त्या आगीने दुसऱ्या गाळा नाकोडो ज्वेलर्स -अशोक जैन यांचा व वरच्या मजल्यावर वास्तव करणारे मालक- उमेश गोबरे यांच्या वरच्या मजल्यावर आग लागुन पुर्णतः ही एक मजली इमारत जमीन दोस्त झाली यामध्ये करोडो रुपयांचा नुकसान झाला असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सहकार्य करणारे नागरिक सनी जैन यांच्या डोक्यावर इमारतीचे कौल्ले पडुन जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर असे आहे की रोजच्या प्रमाणे अशोक जैन देवळातून घरी परताना बाजुला असणाऱ्या विजय जैन यांच्या कपड्यांच्या दुकाना मधुन धुर येत आहे हे दिसताच अशोक जैन यांनी विजय जैन यांना कळविण्यात आले.त्वरीत विजय जैन येऊन आपलं दुकान उघडताच इंन्वटर जवळ आग पेटत आहे जैन यांनी स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु कपड्यांला आग लागल्याने ही आग भडकत गेली त्वरित मुरुड जंजिरा नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांना कळविण्यात आले.ताबडतोब घटनास्थळी अग्निशमन गाडी घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न हिंदू व मुस्लीम बांधव एकत्र येऊन करत होते परंतु आग भडकत गेली.
ही आग विझविण्यासाठी शहरातील व पंचक्रोशी भागातील शेकडो नागरिकांनी आजुबाजुच्या असणाऱ्या विहीर तुन नळातुन पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करत होत.तर काही जवानांनी व नागरिकांनी घराला बाहेरून सिडी लावुन घरातील सिलेंडर बाहेर काढण्यात आले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमनाचे ६ बंब, ट्रकर ६, पाच हजार लिटरच्या १० ड्रम पाणी लागली तरी आग आटोक्यात येत नसल्याने अखेर रोहा येथील अनिकेत तटकरे मित्रमंडळाचे तज्ज्ञ सागर दहिमबेकरआणि सहकारी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, त्यांनी उरलेली आग वीजवली आणि मौल्यवान वस्तू व साहित्य काढून दिले .
मुरुड बाजारपेठेतील रस्ते अधीच अरूंद त्यात मुरुड जंजिरा नगरपरिषदेकडे अग्निशमन दलाची एकच गाडी असल्याने ही आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होते.तरी नगरपरिषदेने आजुन एक अग्निशमन दलाची गाडी मागुन नागरिकांचे जीवनाचे सौरक्षण करावे तसेच पाण्याचा साठा व लाईट गेल्यावर डिझेलवर चालणाऱ्या मोटार व लांब पाईप हे मुरुड असल्याला हवे याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडुन देण्यात आली आहे.
उमेश गोबरे हे काल नातेवाईकांच्या लग्नाला सहकुटुंब मुंबई ला गेल्याने त्यांचं घर बंद असल्याने, त्यांच्या घरातील सर्व मौल्यवान वस्तूसह सर्व सामान्याची नासधुस झाली तरी तातडीने शासनाने भरपाई मिळुन द्यावी, तसेच दानशूर व्यक्ती नी थोडी फार मदत करावी असे आवाहन नागरिकांकडुन होत आहे.