वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी मुलाने दिले जागतिक विक्रमचे गिफ्ट

उरण, विरेश मोडखरकर

१३ वर्षीय आर्य किशोर पाटीलने घडवला इतिहास, २४ कि. मि. बटरफ्लाय प्रकारात पोहून केला जागतिक विक्रम

‘इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड’ने करण्यात आले सन्मानित

इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवार्डने आर्याला सन्मानीत करण्यात आले.
  उरणच्या १३ वर्षीय आर्यन किशोर पाटीलने आपल्या वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. धरमतर ते कासा खडक हे सागरी २४ कि. मि. अंतर  जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'बटरफ्लाय' प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केला आहे. बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांबपल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरला आहे. याची नोंद 'इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड' ने घेत त्याला सन्मानीत देखील केले आहे. त्याच्या या प्रयत्नासाठी वडील किशोर पाटील  वर भाऊ हितेश पाटील यांनी त्याला प्रशिक्षण दिले आहे. 
   उरण, केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंटमेरीज हायस्कुल, उरणमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत असून, तो उत्तम जलतरणपटू आहे. तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत. वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होऊशकले नाही. वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावें या प्रबळ इच्छेने आर्यने मोठा सराव करत १८ डिसेंबरला जागतिक विक्रमची नोंद केली आहे.  महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे निरीक्षक डॉ. प्रशांत शहा यांनी याची नोंद केली आहे. अवघ्या १३ व्या वर्षी केलेल्या विक्रमबाबत बोलताना आर्य याने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर करताना रात्रीचा काळोख, समोरून येणारी जहाज, प्रचंड थंडी आणि लाटांचा मारा यातून हा विक्रम केला असल्याचे म्हटले आहे. तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमबाबत बोलताना भावना अनावर झाल्या. आपले अपुरे स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण केले असून, मला माझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्याने फिलेले सर्वोत्तम गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी 👆👆👆 क्लिक करा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page