उरण, प्रतिनिधी

सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांचे सुचनेनुसार व सहा.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे,हरीभाऊ जेजुरकर कार्यालय पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५/०१/२०२५ रोजी उरण येथे वाहन चालक व वाहन मालिकांमध्ये जन जागृती व्हावी यासाठी केअर पाॅईंट हाॅस्पिटल ते उरण चारफाटा अशी मोटार सायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली.या रॅलीचे सुरुवातीला वाहन चालकांनी वाहन चालविताना कोणती काळजी घ्यायची या बाबत माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे उपस्थित वाहन चालक व परिवहन विभागातील अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रतीज्ञा घेतली. या रॅली मध्ये साधारण ७० ते ७५ महिला व पुरुष मोटार सायकल स्वार व मोटार ट्रेनिंग स्कूलच्या वाहनांनी सहभाग घेतला होता.

यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरीक्षक दिपक भोंडे,राकेश रावते,सहा.मोटार वाहन निरीक्षक भाऊसाहेब कदम उरण येथील श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक बळीराम ठाकुर,उरण मोटार ट्रेनिंग स्कूलचे दानिश मुकरी,हरी हरेश्वर मोटार ट्रेनिंग स्कूलचे जितेंद्र प्रधान, गणेश मोटार ट्रेनिंग स्कूलचे गणेश भोईर, राघोबा मोटार ट्रेनिंग स्कूलचे प्रितम पाटील तसेच उरण येथील वाहन चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.