उरण, प्रतिनिधी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे धोरण आहे. धोरणाचे उद्दिष्ट शिक्षण अधिक लवचिक, सर्वसमावेशक आणि बहुविद्याशाखीय बनवणे आहे. या आव्हानां साठी विद्यार्थ्यांची तयारी होणे ही काळाची गरज आहे. हे आव्हान समोर ठेवून रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथील प्राध्यापकांनी स्कूल कनेक्ट अभियान हाती घेतले.

या अभियानांतर्गत उरण परिसरातील 8 कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना NEP 2020 ह्या बदललेल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल मार्गदर्शन केले. या अभियानामध्ये प्रामुख्याने फुंडे, चिरनेर, दिघोडे, गव्हाण, जासई , नवीन शेवे, पीरकोन व उरण येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील सुमारे 750 विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यात आले. ह्या शैक्षणिक धोरणानुसार शिकवले जाणारे विविध विषय मेजर, मायनर, इंडियन नॉलेज सिस्टम ,स्किल्स कोर्स त्यांचे गुण, परीक्षा पद्धत, ईत्यादी सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आमोद ठक्कर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला. NEP 2020 कमिटी च्या अध्यक्षा डॉ श्रेया पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली. उपप्राचार्य दिलीप केंगार डॉ स्मिता तांदळे , प्रा गजानन चव्हाण, डॉ सि डि धिंदळे , डॉ जावळे आर.एस, डॉ गुरूमीत वाधवा ,प्रा राम गोसावी, प्रा पंकज भोये, प्रा प्रांजल भोईर, प्रा भूषण ठाकूर , प्रा प्रियांका ठाकूर, प्रा दीक्षिता म्हात्रे, प्रा देवेंद्र कांबळे या प्राध्यापकांनी विविध महाविद्यालयांमध्ये जावून मार्गदर्शन केले.
