उरण, विरेश मोडखरकर
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 2 वर्षात मिळविली 100 बक्षिसे

उरण मधील 9 वर्षीय आराध्या विनोद पुरो हीने बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुंबई, मुंबई उपनगरांसह ठाणे, रायगड , कल्याण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बक्षीसांचे शतक गाठले आहे. तिच्या या यशानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळत असल्याच्या भावना तिच्या आई वडिलांनी व्यक्त केल्या आहेत. आराध्याला पुढे ग्रँड मास्तर बनून देशाचे नाव उज्वल करायचे असल्याचे तीने सांगितले.

बातमीचा व्हिडीओ पहाण्यासाठी ☝️☝️☝️क्लिक करा
आराध्या ही उरण एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमध्ये इयत्ता ३ री ईयत्तेमध्ये शिकत असून, तीला शालेय अभ्यासा व्यतिरीक्त बुद्धीबळ हा खेळ आवडत आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून आराध्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपासून ती सातत्यपूर्ण अतीशय एकाग्रतेने खेळत आहे. आराध्याने गेल्या दोन वर्षांत १०० स्पर्धांमध्ये सहभाग घेत प्रत्येक स्पर्धेत तीने यश संपादीत केले आहे. रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी ठाणे, कोरम मोल येथे झालेल्या जिल्हास्थरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेत, आराध्याने शंभराव्या स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे. या निमित्ताने तीने तीच्य बक्षिसांची शंभरी दोन वर्षांत पूर्ण केली असून, तीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तीचे संपूर्ण उरण तालुक्यातून नव्हे तर नवीमुंबई, रायगड जिल्ह्यातील जनतेकडून कौतुक केले जात आहे. आराध्याने तिच्या यशानंतर तीने मिळवलेली शंभरावी ट्राॅफी छत्रपती शिवरायांच्या चरणावर ठेवून, भविष्यात बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ग्रँडमास्टर होण्याची ईच्छा दर्शविली आहे. विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आराध्याचा सत्कार उरणमधील नागरिकांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी आराध्याचे बुद्धिबळ प्रशिक्षक संदीप पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक अतूल ठाकूर, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनःश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, उद्योग पती सुरेश ठाकूर, प्रा.निरंतर सावंत , सामाजिक कार्यकर्त्या लता पानसरे, नगरसेवक समिर मुकरी उपस्थित होते. या प्रसंगी कामगार नेते संतोष पवार आणि प्रशिक्षक संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आराध्याला भावी काळात तीची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान पणीच तीची आई रश्मी आणि वडील विनोद पुरो यांनी आपल्या मुलीची आवड लक्षात घेऊन तीला पुर्णपणे सहकार्य करणाचा निर्णय घेत तिला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. तर तिच्या भविष्यातील वाटचालिसाठी तिच्या मागे ठाम उभे रहाणार असल्याचे पालकांनी यावेळी म्हटले आहे. उरण तालुक्यातील छोट्याश्या बोरी गावातील नऊ वर्षीय आराध्याने एव्हड्या कमीवेळात बक्षीसांची शंभारी गाठवून सर्वांनांच चकित केले आहे. तिच्या या कौशल्याची दाखल घेत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
