उरण, विरेश मोडखरकर

उरण, फणसवाडी येथील सामान्य कुटुंबातील सहा वर्षीय परिधी प्रमोद घरत या चिमुर्डीने नवा विक्रम केला आहे. जगविख्यात बंदर घारापुरी ते मुंबई, गेटवे ऑफ इंडिया हे सागरी 12 किमी अंतर तीने अवघ्या 6 तास 5 मिनिटात पोहून पार केले आहे. परिधी उरण एज्युकेशन स्कुलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून, तिला पोहण्याची आवड आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी ☝️☝️☝️क्लिक करा.
खेळण्या बागडण्याच्या वयात मुले जेव्हा साहसी कृत्य करतात तेव्हा त्यांच्या पालकांची छाती नक्कीच अभिमानाने फुगून येत असते. परिधीने देखील आपल्या जलतरणातील कसब पणाला लावत पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे. उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावावर अवघ्या एक वर्षाच्या सरावानंतर तीने हा विक्रम केला आहे. यासाठी तीने दररो चार तास सरावं करून, कठोर मेहनत आणी जिद्धीच्या बळावर हा विक्रम करून दाखवला आहे. घारापुरी बंदर येथून पहाटेच्या काळोखामध्ये 4 वाजून 38 मिनिटांनी तीने समुद्राच्या लाटांवर झेप घेत विक्रमाला सुरुवात केली. काळोखामध्ये फेसाळणाऱ्या लाटा, जेएनपिटी बंदरमध्ये येणारी मोठी जहाज, नाकातोंडात जाणारे खारे पाणी, वाटेत डॉल्फीन माशांचा वावर त्यातून सलग सहातास हातपाय हलवत पोहत रहाणे, अशा अनेक अडचणींना सामोरे जात अखेर परिधीन मुंबई सर केली. बुधवार दी.4 फेब्रुवारी रोजी तीने हा विक्रम 6 तास 4 मिनिटात पूर्ण करून, सर्वांना सुखद धक्का दिला आहे. तिच्या या विक्रमाबाबत बोलताना तिच्या पालकांनी तीची जलतरणाबाबत असणारी आवड आणी जिद्धीमुळे तीने हे यश मिळवले असून, आम्हाला तिचा अभिमान आहे असे म्हटले आहे. तर परिधीला जलतरण या खेळप्रकारातुन पुढे आणखी मोठ्या विक्रमांना गावसणी घालायचे असल्याचे ती म्हणत आहे. तिच्या या विक्रमाची दखल घेत उरणच आमदार महेश बालदी यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. तर अवघ्या सहाव्या वर्षी विक्रम करून, आपली ओळख निर्माण करणाऱ्या परिधीचे कौतुक नातेवाईक, शाळा प्रशासन, जलतरणपटू, शेजारी, उरणकर तसेच तिचे सावंगडी करत आहेत.
