उरण,वैशाली कडू

उरण नगरपालिका हद्दीतील गिरीराज को.हौ. सोसायटीची इमारत धोकादायक झाली आहे. इमारती संदर्भात नगरपालिकेने आदेश देऊन इमारत खाली करण्यास सांगितले होते. याबाबत नगरपालिकेने नोटीस दिल्यानंतर रहिवासी खाली झाले, परंतु भाडेतत्त्वावर असलेल्या पोस्ट कार्यालयालाही वारंवार नोटीस देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कार्यालयातील कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. तरी नगरपालिकेने सदरची धोकादायक इमारत तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

उरण नगरपालिकेने गिरीराज सोसायटीची इमारत धोकादायक जाहीर करताच तेथील रहिवाशांनी इमारत खाली केली. परंतु सदर इमारतींमध्ये पोस्ट कार्यालय कार्यरत आहे. पोस्ट कार्यालयाला वैयक्तिक नोटीस देऊन स्थलांतर करण्यास सांगितले आहे. गेली वर्षांपासून याची सूचना व नगरपालिकेने वारंवार नोटीस देऊनही भाडेतत्त्वा वरील पोस्ट कार्यालय हे ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोस्ट कार्यालयात येणारा ग्राहक व आजूबाजूचे रहिवाशीही जीवमुठीत धरून जगत आहेत. तरी नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन सदर धोकादायक इमारत त्वरित जमीनदोस्त करण्यासाठी कायदेशीर प्रकिया सुरू करावी, अन्यथा धोकादायक इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आजूबाजूच्या रहिवाशांकडून व ग्राहकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
गिरीराज को. हौ. सोसायटीची इमारत अत्यंत धोकादायक झाल्याने रहिवाशांनी स्थलांतर केले आहे. परंतु येथील भाडेतत्त्वावर असलेले पोस्ट कार्यालयाला वारंवार नोटीसद्वारे सूचना देऊनही ते स्थलांतर करीत नसल्याने ग्राहकांच्या जीवाशी ते खेळत आहेत. तरी त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी.
संदीप पाटील, रहिवासी