उरण, विरेश मोडखरकर

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन आणि इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आय.सी.टी.सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल भोईर गार्डन, कोट नाका, उरण येथे ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती आणि मोफत थर्मल मेमोग्राफी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन रविवार, दिनांक ९ मार्च आणि १० मार्च रोजी करण्यात आले होते. डॉ. घनश्याम पाटील (अध्यक्ष, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन), डॉ. सलील पाटकर (आय.सी.टी.सी वाशी आणि पनवेल), डॉ. सत्या ठाकरे (सेक्रेटरी, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन), आणि डॉ. सचिन गावंड (खजिनदार, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे ब्रीदवाक्य म्हणजे महिला सक्षमीकरण आणि मानवता सक्षमीकरण. या संस्थेच्या माध्यमातून आजारांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी वैद्यकीय सेवा प्रदान केली जाते. या सेवांमुळे न केवळ व्यक्तीचे आरोग्य उत्तम होते तर त्यांना जीवनदान मिळते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते विश्वास, आदर, आणि संवाद यावर आधारलेले असते. या शिबिरात उरणमधील विविध सामाजिक संस्थांचा सहभाग होता. वुमेन ऑफ विस्डम सामाजिक व शैक्षणिक संस्था उरण, कुटुंबिनी महिला संघ उरण, कलश इंटरटेनमेंट, माई फाउंडेशन, पत्रकार उत्कर्ष समिती, स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, महालन सामाजिक संस्था उरण, आधार फाउंडेशन या संस्थांनी या उपक्रमात भाग घेतला. या शिबिराच्या यशासाठी सीमा घरत, श्लोक पाटील, कल्पना सुर्वे, सारिका पाटील, आरती ढोले, नम्रता पाटील, तृप्ती भोईर, रंजना म्हात्रे या महिला कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. दोन दिवसांच्या कैंपमध्ये १४२ महिलांचे थर्मल मेमोग्राफी स्क्रीनिंग करण्यात आले. डॉ. संगीता डाके (एमडी गायनोलॉजिस्ट), डॉ. मोना बोरकर (एमडी गायनोलॉजिस्ट), डॉ. कृष्णा बोरकर (ग्यानॅकॉलोगीस्ट), डॉ. रंजना म्हात्रे (कल्चरल सेक्रेटरी), डॉ. शुभांगी मोकल (कल्चरल सेक्रेटरी), डॉ. सुलोचना पाटील, डॉ. राणू ठाकरे, डॉ. प्राजक्ता कोळी, डॉ. दया परदेशी, डॉ. सविता ढेरे, डॉ. वनिता पाटील या महिला डॉक्टरांनी या शिबिरासाठी महत्वाचे योगदान दिले.
उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे पेट्रोन डॉ. सुरेश पाटील, डॉ. मंगेश डाके, आणि डॉ. संजीव म्हात्रे हे शिबिरात पूर्ण वेळ उपस्थित राहून शिबिराला मार्गदर्शन केले.