लोढा डेव्हलपर्सने महिला गटाला दिली प्रकल्पामध्ये उपहारगृहाची जबाबदारी

अलिबाग प्रतिनिधी, अमूलकुमार जैन

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून, महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवले जात आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी, शासनाकडून अनेक योजना सुरू आहेत, जसे की अन्न प्रक्रिया उद्योग, पर्यटन क्षेत्र आणि जलसंधारण यांसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. अशीच संधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे असणारा लोढा गृह प्रकल्प मध्ये उपहार गृह चालविण्याची जबाबदारी मांडवा येथील महिला बचत गटाला देत स्तुत्य उपक्रम राबवित असल्याची माहिती लोढा प्रकल्पाच्या प्रवक्त्या दिशा परब यांनी सांगितले.

मुंबई पासून समुद्रमार्गे काही किलो मीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील जेट्टी नजीक लोढा डेव्हलपर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी कार्यरत असणारे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असणारे उपहारगृहाची निर्मिती प्रकल्प क्षेत्रात करीत त्यांनी मांडवा गावातील आठ गृहिणी यांना लोढा डेव्हलपर्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून लोढा कंपनीने हा उपक्रम सुरू केला असून, या महिलांना स्वयंपाकघरासाठी जागा आणि साहित्य मोफत उपलब्ध करून दिले असल्याचेही लोढा प्रकल्पाच्या प्रवक्त्या दिशा परब यांनी सांगितले. आठ गृहिणीं यांनी सदर उपहारगृहाची जबाबदारी घेत स्वतःसहित कुटुंबाचा विकास साधण्यासाठी उपहारगृह चालवित असल्याने लोढा डेव्हलपर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पातील कामगारांना ताजे, घरगुती जेवण पुरविले जात आहे. लोढा डेव्हलपर्स अलिबागमधील मांडवा गावाजवळ एक प्रकल्प बांधत आहे. लोढा डेव्हलपर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पात नेहमी शेकडो कामगार असतात, त्यामुळे तिथे उपहारगृह सुरू करायचे होते. सुरुवातीला अनेक व्यावसायिक उपहारगृह चालक यांना संपर्क साधला, पण लोढा कंपनीला स्थानिकांना रोजगार द्यायचा होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक महिलांनी उपहार गृह चालवावी, अशी कल्पना मांडली. “ही बातमी गावात पसरताच मांडव्यातील महिलांनी बैठक बोलावली. आम्हाला स्वयंपाकघरासाठी सामान जमा करायचे होते, जेवण बनवायचे होते आणि कर्मचाऱ्यांना पुरवायचे होते. आम्ही कमावलेला नफा आमचाच असेल, फक्त जागा लोढा कंपनी देणार होती. थोड्या चर्चेनंतर आम्ही आठ जणींनी एकत्र येऊन उपहार गृह चालवायचे ठरवले,” असे मांडव्यातील रहिवासी नमिता आशिष गवंड म्हणाल्या. या सर्व महिलांनी मिळून किराणा, फ्रिज, व्यावसायिक स्टोव्ह आणि भांडी खरेदी करण्यासाठी पैसे गोळा केले. अवघ्या आठवड्यात स्वयंपाकघर तयार झाले. लोढा कंपनीने जागा आणि फर्निचर मोफत दिले. हा गट आता शिफ्टमध्ये स्वयंपाकघर चालवतो. एका वेळी त्यापैकी तीन जणी स्वयंपाक करतात, जेवण वाढतात आणि स्वच्छता करतात. या उपक्रमामुळे या महिलांना खूप समाधान मिळत आहे. “आमच्यापैकी बहुतेकांनी याआधी कधी बाहेर काम केले नव्हते. ही आमच्यासाठी पहिलीच संधी होती, विशेषत: कारण आम्ही उपहार गृह चालवून नफा कमवणार आहोत. आम्ही खूप आनंदी आहोत, कारण आम्हाला काम मिळाले आहे आणि आम्ही दरमहा आठ ते दहा हजार रुपये घरी घेऊन जातो,” असे कामिनी प्रशांत म्हात्रे यांनी सांगितले. कामिनी यांच्या पतीचे कर्करोगाने नुकतेच निधन झाले होते, आणि त्या आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी धडपडत होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page