उरण, प्रतिनिधी

नॅशनल डॉक्टर्स डे च्या निमित्ताने, “इन मेजर सिटी” व “रायगड मेडिकल असोसिएशन” यांच्या सौजन्याने “आरोग्यंम धनसंपदा” ह्या नवी मुंबई येथील दिमाखदार सोहळयामध्ये उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन चे सदस्य, प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सत्या ठाकरे ह्यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल “मेडिकल एक्सेलन्स अवार्ड” देवून सन्मानित करण्यात आले. रायगड व नवी मुंबई येथील प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा अपूर्व सोहळा पार पडला. यावेळी उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. घनशाम पाटील हे देखील या सोहळ्यास उपस्थित होते.