जलक्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची विजयी घौडदौड!मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागातर्फे युवा खेळाडूंचा सन्मान

उरण, विरेश मोडखरकर

मैसूर येथे अलीकडेच पार पडलेल्या ज्युनिअर आणि यूथ मल्टी-क्लास नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या जलक्रीडा संघाने मिळवलेली जबरदस्त कामगिरी आणि पदकांची लयलूट यामुळे संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागामार्फत सन्मान नुकताच मुंबईतील मंत्रालय येथे करण्यात आला.

मैसूरमध्ये आपल्या कामगिरीचे ठसे उमटवल्यानंतर राज्यात परत आलेल्या नाव्या काकू (१२ वर्षे) – सुवर्ण पदक विजेती, वृतिक म्हात्रे (९ वर्षे) – कांस्य पदक विहेती, व्योम जाधव (१३ वर्षे) पदक विजेता, अम्मान शेख (१४ वर्षे) पदक विजेता, मोहित म्हात्रे (१३ वर्षे) सुवर्ण पदक विजेता, रुद्राक्षी टेमकर (१४ वर्षे) सुवर्ण पदक विजेती, प्रियांशी पाटील (१३ वर्षे) रौप्य पदक विजेता, साई पाटील (१७ वर्षे) सुवर्ण पदक विजेता या खेळाडुंचे मुंबई, मंत्रालंय येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंच्या चिकाटी, मेहनत आणि शिस्तीबद्दल मंत्र्यांनी यावेळी भरभरून कौतुक केले. तर “राज्यातील जलक्रीडांची लोकप्रियता आणि कामगिरी दोन्ही वाढत आहेत. अशा प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देणे ही शासनाची जबाबदारी आहे, आणि आम्ही ती नक्की पार पाडू.” असे आश्वासनही यावेळी या खेळाडुंना दिले आहे. या खेळाडुंना प्रशिक्षित करणारी “याचिंग असोसिशन ऑफ महाराष्ट्रा” ही संस्था जलक्रीडांमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याचे कार्य करत आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनामुळेच कमी वयातील मुलेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. YAM चे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि पालक यांचा सुद्धा मंत्री महोदयांनी विशेष उल्लेख करत आभार मानले. खेळाडूंनी मिळवलेले यश हे केवळ वैयक्तिक नाही, तर महाराष्ट्राच्या जलक्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page