आमच्याबद्दल

 नमस्कार,
सोशल मीडिया हे माहिती प्रसारणाचे उत्तम स्रोत तयार    झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील  माहिती तात्काळ उपलब्द होतं असते. तर सध्या करमणुकीचे उत्तम माध्यम म्हणून देखील सोशल मीडियाकडे पाहिले जात आहे. मात्र आपल्या विभागातील किंवा आसपासाच्या दुनियेतील ‘बित्तम बातमी’ ती ही खरी खुरी जाणून घ्यायची असल्यास, एकतर वृत्तपत्र किंवा वृतवाहिनी पहावी लागते. मात्र सध्याच्या धावात्या युगामध्ये यासाठी कुणाकडे फारसा वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच वायरल झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेऊन, अफवा पसरल्या जातं आहेत. यामुळेच एक प्रभावी माध्यम सध्या प्रचलित होतं आहे. ते म्हणजे “पोर्टल”. धावात्या युगात सहजासाहाजी कोणत्याही वेळेत, जेव्हा शक्य होईल तेव्हा आणि कोणत्याही ठिकाणी आपल्या परिसरातील, आपल्या अवतिभावती घडणाऱ्या घाटंनांची माहिती मिळवण्याचे योग्य आणि भरवशाचं माध्यम अशी ओळख “पोर्टलची” होऊ लागली आहे. आपल्या विभागातील घडामोडिंची माहिती हातामधील मोबाई फोन द्वारे आपल्याला केव्हाही मिळत असल्याने, हे माध्यम नागरिकांच्या पसंतीस येत आहे. याचाच विचार करून, आम्ही “नवराज्य” हे पोर्टल ‘ डिजिटल युगाचे, डिजिटल बातमीपत्र’ ही टॅगलाईन घेऊन सुरु करीत आहोत. या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या परिसरातील घाटंनांची माहिती प्रत्येकाला मिळावी असा आमचा प्रयत्न असणार आहे. दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारीत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात होत असलेल्या “नवराज्य” या पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो……. धन्यवाद….. 🙏🙏🙏

विरेश म. मोडखरकर
मुख्य संपदक ९९३०७४१९९९

Please Share

You cannot copy content of this page