उरण, प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य औषधी व्यवसाय परिषदेच्या (एम एस पी सी) औषधे माहिती केंद्राच्या (डी आय सी) “निरंतर शिक्षण प्रणाली” अंतर्गत औषधे निर्मात्यांना प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून, उरण तालुक्यातील औषधे निर्माते (फार्मसिस्ट) साठी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम उरण तालुका केमिस्ट असोसिएशनचे वतीने हॉटेल आनंदी भोईर बेंक्विट हॉल, उरण येथे रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आला.

व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य औषध परिषदचे अध्यक्ष अतुल अहिरे आणि औषध माहिती केंद्राचे प्रमुख गणेश बांगले आणि त्यांच्या टीमने एकाच दिवशी ३६ जिल्ह्यात ४४ ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा विक्रम महाराष्ट्र राज्य औषध परिषदेने केला. त्याच अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम “फार्मसी मॅनेजमेंट कोर्स” उरण येथे आयोजित आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य औषध परिषद सदस्य नितीन मणियार आणि रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स संघटनेचे अध्यक्ष लिलाधर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे महत्त्व
औषधे निरीक्षक श्री हेमंत आढे यांनी औषध निर्मातांसाठी प्रशिक्षण कोर्स आयोजित करत असल्या महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल आणि संघटनेचे कौतुक करून या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन सर्व औषध निर्माता बंधू भगिनी नी रुग्ण सेवा द्यावी असे सांगितले. ज्येष्ठ फार्मासिस्ट शशांक म्हात्रे यांनी व्यवसाय संबंधी मार्गदर्शन केले, तर सौ. पूजा निकम यांनी सर्व औषध निर्माता बंधू-भगिनींना उत्तम प्रशिक्षण दिले.

संघटनेचा सहभाग
रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य श्री विकास नाईक, सुधीर काटले, विवेक शिंदे, नितीन गावंड, सचिन सितापराव संजय धनासुरे कोर्स कॉर्डिनेटर संतोष घोडींदे उपस्थित होते. उरण तालुक्यातील 45 औषध निर्माता बंधूनी या प्रशिक्षणाचा फायदा करून घेतला. रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष लीलाधर पाटील सचिव प्रवीण नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा संघटनेचे पदाधिकारी मनोज ठाकूर, उरण तालुका संघटनेचे अध्यक्ष श्रीउमाकांत पानसरे सचिव राजेश्वर गावंड, सदस्य बाळू घालवट, सौ. जयश्री महाजन, सौ.सुवर्णा बोराडे यांनी खूप मेहनत घेतली.
