उरण, वैशाली कडू

अखिल आगरी समाजा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित राजकीय पटलावरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अखिल आगरी समाजाच्या उरण तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ. सीमा अनंत घरत यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र ही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

सीमा घरत या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी अनेक समस्यां मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज संपन्न झालेल्या अखिल आगरी समाजाच्या कार्यक्रमात उरण तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सौ. सीमा अनंत घरत यांच्यावर सोपवित त्यांना नियुक्तीपत्र ही देण्यात आले. तसेच सीमा घरत सर्व लढ्यामध्ये सक्रीय सहभागी आहेत. त्याची ही दखल समाजाने घेऊन त्यांना दि.बा. पाटील योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, अखिल आगरी समाजाचे अध्यक्ष दशरथ पाटील, अतुल पाटील व इतर उपस्थित होते.
