उरण, प्रतिनिधी

रविवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील जासई गावात एका युवकावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमी युवकाचे नाव प्रेमसिंग यादव (वय अंदाजे ३०) असे असून, तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी जासई महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या प्रकरणी आक्षेप घेतल्याचा राग मनात ठेवून हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येतं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चार जण दोन दुचाकींवरून (क्रमांक नसलेल्या) येऊन जासई गावाजवळ डबा धरून बसले होते. प्रेमसिंग यादव हा तरुण रात्री १२ वाजतांच्या दरम्यान आपल्या घरी परतात असताना या चार जणांकडून त्याच्यावर हला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, तसेच लोखंडी रॉडसारख्या वस्तूने पोटात व डोक्यावरही मारहाण करण्यात आली. प्रेमसिंग यांनी प्रसंगावधान राखत हातावर वार झेलले व तातडीने घटनास्थळावरून दूर पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर जासई गावातील काही स्थानिक युवकांनी त्यांना उरण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथून पुढील तपासणीसाठी त्यांना वाशी येथे हलवण्यात आले असता त्याच्या हाताला आठ टाकेल पडले असून, छातीच्या बरगड्यांनाही दुःखापत असल्याचे नुष्पन्न झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, हातावर खोल जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जासई येथील महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करत त्या संदर्भातील व्हिडीओ ओ्रवमसिंग यादव यांच्याकडून व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत पोलिसांत देखील कळवण्यात आले होते. तर त्यानंतर धाबा चालकाकडून सिंग यांना जीवे मारण्याची धमकी दवखील देण्यात आली होती. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार फेखील दाखल करण्यात आली आहे. सिंग यांच्यावर झालेला हल्ला हा याच प्रकरणातून झाला असल्याचा संशय असून, हल्ला करतेवेळीस हल्लेखोरांनी महाराष्ट्रात धाबा प्रकरणाचा उल्लेख केला असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. झालेल्या या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून, संबंधित हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि जासी येथील महाराष्ट्रात धाब्यासाहीत तालुक्यातील सर्व बेकायदेशीर धाबे तालकाल बंद करा आशी मागणी केली जात आहे.