उरण प्रतिनिधी

उरण येथील न्यायालयाच्या परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सायकल रॅली व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात न्यायालयीन कर्मचारी, वकील, वनविभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते पर्यावरणपूरक सायकल रॅलीचे आयोजन. सदर रॅलीने परिसरात हरित संदेश दिला. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले, जे परिसरात हरित आच्छादन वाढविण्यास मदत करणार आहे. या उपक्रमासाठी उरण वकील संघटनेचे माननीय अध्यक्ष ॲड. विजय पाटील सर, माजी अध्यक्ष ॲड. पराग म्हात्रे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय न्यायाधीश काझी सर, माननीय न्यायाधीश वानखडे सर, व माननीय न्यायाधीश तंडन मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाला प्रेरणा दिली. तसेच उरण वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच वकील संघटनेचे विविध पदाधिकारी व सदस्य देखील या कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी झाले. या उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारीची जाण, पर्यावरणाबद्दलची संवेदना आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी ठरविण्यासाठी सर्व संबंधितांनी मेहनत घेतली.


“निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा” हा संदेश घेऊन उरण न्यायालयाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.