
फुंडे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. स्वा.वीर सावरकर माध्यमिक व ज्युनियर कॉलेज नवीन शेवे येथे व तु. ह.वाजेकर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज फुंडे येथे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, जीवन भोईर सचिव स्वा.वीर सावरकर विद्यालय नवीन शेवे,प्राचार्य,संतोष म्हात्रे, प्राचार्य बबन साळुंखे, प्र-प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा या महाराष्ट्र शासन मिशन योजनेचा भाग म्हणून दरवर्षी फुंडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ वृक्षारोपण करीत असतात.या प्रसंगी प्रा.राम गोसावी, प्रा.माने, प्रा.खेडकर तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
